Subscribe Us

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक संपन्न



धाराशिव -
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना समन्वयक तथा माजी आमदार श्री. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक उमरगा व तुळजापूर येथे पार पडली.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीला धाराशिव-कळंब विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवासेना तसेच शिवसेनेच्या अंगीकृत विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

 महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व नेत्यांनी आशीर्वाद घेतले. तुळजापूर येथील भेटीने धार्मिक आणि भावनिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारली, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
       या बैठकीस माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, मोहन पनुरे, तसेच तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
     राजन साळवी यांनी आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षशिस्त, संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेच्या अडचणींवर तातडीने कृती यावर भर देण्याचे निर्देश दिले. स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन ते मार्गी लावण्यासाठी तातडीने योजना आखण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
    तसेच, पक्षाच्या सध्या सुरु असलेल्या सदस्य नोंदणी अभियानात अधिक गती आणण्यासाठी सर्वांनी गावपातळीवर सक्रिय राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
   बैठकीत कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या समस्या आणि सुचना मांडल्या. यावर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, भविष्यातील निवडणुकीसाठी अधिक भक्कम रणनीती आखली जाईल, असे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments