मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबई संदर्भात धाराशिव जिल्ह्याची तयारी संदर्भात आढावा बैठक मंगळवार दि. 05 ऑगस्ट रोजी रोजी धाराशिव येथे मुक्कामी दौरा आयोजित केला आहे.
यावेळी मराठा आंदोलक,मराठा सेवक,मराठा संघटना, लोकप्रतिनिधी सर्वांसोबत सविस्तर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील मंगळवारी सकाळी 10 वाजता हॉटेल साईलिला (राजासाब) येथे येणार आहेत संपूर्ण दिवसभर जिल्हातील मराठा बांधवासोबत,29 ऑगस्ट चलो मुंबई मराठा आरक्षणाची अंतिम लढाई संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत.
मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम धाराशिव शहरातच असणार आहे. या दरम्यान पत्रकार परिषदेचे आयोजन ही करण्यात आलेले आहे.
त्यामुळे धाराशिव जिल्हातील सर्व सामाजिक संघटना,मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी,कर्मचारी संघटना,तसेच मराठा समाजातील शेतकरी,व्यापारी,उदयोजक,वकील शिक्षक,विदयार्थ्यांनी व समाज बांधवांनी होणाऱ्या चर्चा सत्रात मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज धाराशिव यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
0 Comments