तेरणेचा छावा/ चोराखळी:-
येथील 'महाकालिका कला केंद्राच्या समोर सोमवारी दि.४ ऑगस्ट) रोजी सायंकाळी 07:30 ते 08:00 च्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली असल्याची व यात संदीप यल्लाप्पा गुट्टे (वय ४०) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
याविषयी वृत्त असे की, संदीप गुट्टे हे आपला मित्र अरुण जाधव यांच्यासोबत महाकालीका कला केंद्र मध्ये आले होते. यावेळी जवळच्या बारच्या बाहेर उभे असताना अज्ञात इसमाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी गुट्टे यांना लागल्याने तेऔ जागीच रक्तबंबाळ होऊन पडले. येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने गुट्टे यांना ताबडतोब रुग्णालयात हलवलण्यात आले.
कळंब तालुका सध्या कला केंद्र साठी हब झाले असल्याचे दिसून येत आहे. कारण चोराखळी धाराशिव साखर कारखाना ते आळणी टोल नाका इथपर्यंत जवळजवळ 20 ते 25 कला केंद्रांना परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.कला केंद्राच्या माध्यमातून अनेक अवैद्य धंदेवाल्याचा यात शिरकाव झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या परिसरात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचे नागरिकांतून ऐकावयास येत आहे. कारण दररोज काही ना काही घटना या कलाकेंद्र परिसरात घडत असल्यामुळे तसेच येथे आंबट शैकिनांची , तडीपार गुंडांची गर्दी ही वाढत असल्यामुळे विद्यार्थी, महिला, नागरिक यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परवानगी देताना चे अनेक नियम फाट्यावर बसून प्रशासन कशासाठी परवानगी देत आहे असा प्रश्न परिसरातील सर्वसामान्य जनतेतून एकावयात येत आहे. तसेच येथील घटनेत सामील झालेल्या व्यक्ती तडीपार असल्याचीही चर्चा ऐकावयास येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
0 Comments