धाराशिव तेरणेचा/छावा;-
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार होण्यास भाग पाडून महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आणली व भाजपसोबत घरोबा करून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे खेचून आणले होते. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण होत असतानाच धाराशिव मधील एक बडा नेता शिंदे गट शिवसेनेच्या संपर्कात असल्याची विश्वसनीय सुत्रांनी माहिती असून हा नेता लवकरच आपल्या समर्थकासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे! या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय गणित बिघडणार असून या नेत्याचा नेमका शिवसेनेला फायदा होतो की तोटा हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.
कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा.मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणारांची संख्या दिवसेंनदिवस वाढत चाललेली आहे. यातच धाराशिव मधील एक बडा नेता प्रवेश करण्यात असल्याच्या राजकीय चर्चेची कुजबुज गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे.
या नेत्याने मागील काही महिन्यापासून शिंदे गट शिवसेने विरोधात एक ब्र शब्द सुद्धा न काढल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. परंतु ही चुप्पी कशासाठी होती हे आता जनतेला समजू लागले आहे.
0 Comments