Subscribe Us

गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच


धाराशिव/तेरणेचा छावा:-
  गुटखा व तंबाखुचा धंदा करू देणे व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच मागून तडजोडीअंती १२ हजारांची लाच घेताना धाराशिव पोलिस स्टेशनच्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई  सोमवार (दि.,१९ जून) रोजी केली.
     महादेव वसंतराव शिंदे (वय- 45 वर्षे, पद- पोलीस हवालदार, वर्ग 3, धाराशिव शहर पोलीस स्टेशन, धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांना गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देण्सासाठी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार महादेव वसंतराव शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 15,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 12,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना पोलिस हवालदार महादेव वसंतराव शिंदे यांना ताब्यात घेतले.
       ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – सिद्धराम म्हेत्रे , पोलीस उपाधीक्षक, विकास राठोड, पोलीस निरीक्षक, पोलीस अमलदार मधुकर जाधव, आशिष पाटील, विशाल डोके यांनी पार पाडली
            धाराशिव शहरातील अवैध धंदेवाल्याकडून  हप्ता वसुलीसाठी विशेष पोलीस निमल्याचेही या घटनेवरून दिसून  आहेत तसेच लाचखोरीचे प्रमाण किती खालच्या पातळीवर गेलेले आहे हे यातून   लक्षात येते!.  गुटखा, मटका ,अवैद्य दारू विक्री, तसेच इतर अवैध व्यवसायातून लाखो रुपये महिन्याला गोळा करण्यासाठी पोलीस यंत्रणेने खास फंटरची व्यवस्था केल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. अशाप्रकारे शहरात अवैध व्यवसायाला पोलीस यंत्रणाच पाठीशी घालत आहेत की काय अशीही उलट सुलट चर्चा शहरात चवीने सुरू आहे

Post a Comment

0 Comments