दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून वाशी लातूर बस सुरू करण्याची मागणी होत होती.अनेक वेळा पाठपुरावा करून ही बस सुरू होत नव्हती.दहिफळसह परिसरातील गावातील मुलं लातुर येथे शिक्षण घेत आहेत.तसेच खरेदी विक्री साठी लातुर येथे बरेच व्यावसायिक जोडले आहेत.विद्यार्थी, व्यापारी, रुग्णांना बसची आवश्यकता होती.
बस सुरू करण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायतचे ठराव घेऊन एस टी महामंडळाकडे मागणी केली.विशेष बाब म्हणजे दहिफळ येथील भगवान मते यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहाय्यका कडे थेट मंत्रालयात जाऊन मागणीचे पत्र दिले.थेट एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचा आदेश दिला.काही तांत्रिक कारणांमुळे बस सुरू व्हायला वेळ लागला.शेवटी १७ जुन रोजी बस सुरू झाली.दहिफळ येथे बस येताच तिचे स्वागत करण्यात आले.यावेळी बस चालक बाळासाहेब कवडे, युवराज सरवदे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच बस सुरू केल्याबद्दल आगार प्रमुख टि वाय कवडे यांचे ग्रामस्थांनी अभार मानले.बसचे स्वागत करताना ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments