येरमाळा/तेरणेचा छावा:- - मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे भोंदू बाबा असलेले स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांनी परळी येथील एका महिलेवर लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे लोमटे महाराज यांना तात्काळ जामीन मिळाला होता. त्यानंतर सदर महिलेने न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने लोमटे यांच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला . न्यायालयाच्या आदेशानुसार येरमाळा पोलिसांनी लोमटे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून आणि मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून अटक केली व 16 ऑगस्ट रोजी महाराजाला जमिनीसाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चमत्कार करणाऱ्या भोंदू बाबावर दोन दिवस अंधाऱ्या कोठडीत राहण्याची वेळ आली आहे
मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे . 28 जुलै 2022 रोजी मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात बसली असता महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलच्या खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. लोमटे महाराजांनी आपणावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने करूनही येरमाळा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र सदर महिलेने हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्यानंतर मात्र न्यायालयाने चपराक देताच, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि पंढरपूर येथे अटक केली .
काय आहे भोंदू बाबा महाराजाची पार्श्वभूमी
एकनाथ लोमटे यांनी 2010 सालच्या आसपास मलकापूरचा महिमा या पुस्तकातून आपण कसे देवी चमत्कार करतो व आपणास देव कसा प्रसन्न आहे हे या पुस्तकातून लिखाण करून या पुस्तकाच्या प्रति संपूर्ण महाराष्ट्रभर व आसपासच्या राज्यातही वितरित केलेल्या होत्या त्यामुळे मलकापूर या ठिकाणी लोकांचे लोंढेच्या लोंढे येण्यास सुरुवात झाली यातूनच लाखो भक्तगण तयार झाले दर गुरुवारी व पौर्णिमेला या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले. यातच प्रत्येक भक्तांना प्रत्येकी 500 ते हजार रुपये घेऊन पुस्तक व पूजेचे साहित्य प्रसाद दिले जात होते. अनेक असाध्य रूग्ण बरे होतात या महाराजांच्या प्रचाराने अनेक जन असाध्य रुग्ण येथे घेऊन येऊ लागली. काहीजण रुग्ण ठेवून निघूनही जात त्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत. अनेक राजकीय मंडळी ही या महाराजांच्या सानिध्यात होती त्यामुळे महाराजाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. श्री क्षेत्र मलकापूर पर्यटन स्थळासाठी कोट्यावधीचा निधीही मंजूर करून कामे केलेली आहेत. यातील अनेक कामात गैरव्यवहार झाल्याचेही महाराजांवर आरोप झालेला आहे.
लोमटे महाराजाविरोधात यापूर्वी चमत्कार करून वेगवेगळे आजार बरे करण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची, भोंदूगिरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून . याच महाराजाने महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजाने पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली. या पीडितेच्या तक्रारीवरुन लोमटे महाराजावर गुन्हा दाखल झाला.
मलकापूर येथील लोमटे महाराज यांच्यावर अनेक आरोप असून, या महाराजांविरुद्ध अनेक तक्रारी आहेत तसेच परवा मलकापूर येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर शासनाची फसवणूक करून एक कोटीची निधी हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सरपंचांनी महाराजांनीच आमची फसवणूक केल्याचाही आरोप केलेला आहे.
0 Comments