धाराशिव/ तेरणेचा छावा:-आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
14 ऑगस्ट रोजी भूम तालुक्यातील पाथरूड येथे नव्याने श्रेणीवर्धन झालेल्या प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी करताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंखे,उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,तालुका कृषी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी व इतर विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.
पाथरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयास श्रेणी वर्धन मिळाले असून तीस खाटाच्या दवाखान्याचे रूपांतर 50 खाटाच्या रुग्णालयात होणार आहे.
यावेळी पालकमंत्री प्रा. डॉ.सावंत यांनी आरोग्य केंद्राची तपासणी केली.तेथे उपलब्ध असलेले सेवा,स्वच्छता आणि औषधसाठा याबाबत सविस्तर माहिती घेतली.
0 Comments