Subscribe Us

खोटी कागदपत्रे बनवून एक कोटीचा निधी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल!


धाराशिव तेरणेचा छावा:-
 मलकापूर ता.कळंब येथील सरपंच- रुक्मीन आगतराव घोळवे व मलकापूर ग्रामपंचायत ग्रामसेवक- दिपक लक्ष्मणराव वेदपाठक यांनी दि.22.06.2023 रोजी 10.00 ते 23.59 वा. सु. ग्रामपंचायत मलकापूर येथे संगणमत करुन शासनाची एक कोटी रुपयाचा निधी हडप करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालय मलकापुरचे मासिक सभा ठराव व नाहरकत प्रमाणपत्र हे दस्तऐवज बनावट तयार करुन शासनाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या तुकाराम जगन जाधव, वय 57 वर्षे रा. विस्तार अधिकरी पंचायत समिती कळंब यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  अशा प्रकारची यापूर्वीही अनेक कामे दाखवून निधी तर हडप केला नसेल ना अशी शंकाही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे त्यामुळे याआधी झालेल्या सर्व कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे

Post a Comment

0 Comments