Subscribe Us

श्री येडेश्वरी देवस्थानासाठी 4 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर!


येरमाळा/तेरणेचा छावा:- 
        येथील येडेश्वरी मंदिर परिसर विकासासाठी चार कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.त्यापैकी  एक कोटी ४७ लाख रु.निधी ग्राम विकास पर्यटन व सांसकृतिक विभागाला राज्य शासनाच्या वित्त विभागाने वितरीत केला आहे.
येरमाळा येथील राज्यात प्रसिद्ध असलेल्या आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवी मंदिर विकास कामासाठी राज्य शासनाकडून चैत्र पौर्णिमा यात्रेला निधी मिळावा अशी मागणी होती.यंदाच्या यात्रे नंतर मे महिन्यात श्री येडेश्वरी मंदिराला तीर्थक्षेत्र अ  दर्जा साठी राज्य शासनाकडून जिल्हा परिषदे मार्फत प्रस्ताव मागविण्यात आला होता.अ दर्जाचा प्रस्ताव प्रस्तावित असला तरी (ता.२६ जुलै) रोजी मंदिर पर्यटनासाठी पाच कोटी निधी मिळावा म्हणून धाराशिव तुळजापूर चे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी ग्रामविकास पर्यटन मंत्रालयाला पत्रा द्वारे मागणी केली होती.त्यातूनच प्राप्त निधी मंजूर झाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर रस्त्याला राज्य मार्ग क्रमांक नसल्याने निधी मिळत नव्हता.मंजूर निधीतून मंदिर पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने स्थानिक ग्रामपंचायत,देवस्थान ट्रस्ट,ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२३,२४ अंतर्गत पर्यटन संचानालय व जिल्हा स्तरावरील तीर्थक्षेत्र,मंदिर पर्यटन च्या नवीन विविध कामांना निधी मंजूर करण्यात आला असून यात पर्यटन स्थळी मंदिर परिसर सुशोभीकरण,रस्ते,पायाभूत सुविधा या विकास कामांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी सातशे वीस कोटी निधीला पर्यटन व सांसक्रतीक विभागाच्या मंदिर पायभूत विकास योजना निधीस वित्त विभागाने शासन निर्णयास मंजुरी दिल्याचे परिपत्रक काढले आहे 
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर  येथील मंदिराच्या,परिसर,रस्ते कामासाठी दोनशे कोटी रु मंजुर केले असून साठ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.तर कळंब तालुक्यातील एकुरका येथील माळची आई रेणुका माता मंदिर येथे पर्यटन क्षेत्र विकासा कामासाठी तीस लाख रुपये मंजूर केले असून त्यापैकी नऊ लाख रु.निधी वितरित केला आहे.
तर तुळजाभवानीची धाकटी बहिण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री येडेश्वरी मंदिरा साठी प्राचीन मंदिर,पालखी मार्ग,मंदिर रस्त्यासह मंदिर परिसर विकास कामासाठी चार कोटी नव्वद लाख निधी मंजूर झाला असून एक कोटी ४७ लाख निधी वितरित करण्यात आला आहे.
        तुळजभवानीची धाकटी बहीण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेला व दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.त्यातुलनेत मंदिर परिसर,यात्रा पालखी मार्ग,रस्ते सुख देता याव्या म्हणून आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून प्रशासकिय स्तरावर याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. असल्याची माहिती माजी पं.स.सभापती तथा माजी सरपंच विकास बारकुल यांनी दिली 

Post a Comment

0 Comments