तेरणेचा छावा/धाराशिव:-
कळंब तालुक्यातील सापनाई गाडीची धडक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की
दगडु मनोहर शिंपले, वय 60 रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव हे शुक्रवार दि.01 ऑगस्ट रोजी 07.30 वा. सु. नाथवाडी ते सापनाई रोडवर बाळु मामा मंदीराचे समोर रोडलगत घरासमोर बसले असता मारुती सुझुकी कार क्र 25 एएल 4151 चा चालक बाबुराव विठोबा भोस्कर रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून दगडु शिंपले यांना धडक दिली. या अपघातात दगडु शिंपले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची बहिण राधाबाई अच्युत कवडे, वय 50 वर्षे, रा. सापनाई ता.कळंब जि. धाराशिव यांनी दि.01.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 (1), 125(अ),125(ब) सह 184, 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments