Subscribe Us

पांडुरंग कुंभार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती



तेरणेचा छावा/कळंब:-
धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग गुणवंतराव कुंभार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने ही घोषणा करण्यात आली असून त्यांच्या दीर्घकालीन पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकुशलतेची ही योग्य दखल मानली जात आहे.
     गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पांडुरंग कुंभार यांनी युवक काँग्रेसपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. कळंब नगरपरिषदेचे सलग नगरसेवक, उपनगराध्यक्ष, बाजार समितीचे सभापती अशा विविध पदांवर त्यांनी भक्कम नेतृत्व दिलं आहे.
   गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असतानाही पक्षाच्या आदेशाला प्राधान्य देत त्यांनी नम्रतेने माघार घेतली – ही त्यांची पक्षनिष्ठा अधोरेखित करणारी बाब आहे.
  काही दिवसांपूर्वी त्यांनी संसद भवन, नवी दिल्ली येथे विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली होती.

Post a Comment

0 Comments