Subscribe Us

दुधाळवाडी रस्त्याच्या दुरावस्थेची आ.कैलास पाटलांनी दखल घेत दिला निधी.


कळंब  तालुक्यातील दुधाळवाडी गावाकडे जाणाऱ्या NH 52 वरील दोन किलोमीटर डांबरी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्याने   ग्रामस्थांनी २१ ऑगस्ट २०२५ पासून धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
      रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
    दुधाळवाडी येथील रहिवासी अमोल चंद्रकांत लाटे यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज दाखल केला असून, या अर्जात NH 52 ते दुधाळवाडी या २ किलोमीटर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली होती . 
.  दुधाळवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. व ती बातमी तेरणेचा छावा लाईव्ह वर प्रसारित करण्यात आली होती. या उपोषण इशाऱ्याची तात्काळ दखल आ.कैलास पाटलांनी घेत 10 लाखाचा निधी मंजूर केला आहे. तशीच आणखी इतर योजनेतून रस्ता काम करण्याचा शब्द दिल्याचे सरपंच शिरसाठ यांनी सांगितले.
    दुधाळवाडी ग्रामस्थांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तात्काळ आ.कैलास पाटील यांनी निधी दिल्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत असून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त व्हावा.अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments