तेरणेचा छावा/धाराशिव:-
कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील अंगणवाडीची दुरावस्था बातमी गुरुवार (दि. 24 जुलै )रोजी सकाळी प्रसारित होताच कळंब बालविकास ऑफिस मधून अंगणवाडी तेथे न भरवता. इतरत्र भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
याविषयी सविस्तर असे की संजीतपूर येथील अंगणवाडीची इमारत मोडकळी आलेली असून भिंतीला मोठे मोठे तडे गेलेले आहेत. तसेच भिंत पडून काही जीवितहानी होऊ शकते, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याच्या आशयाची बातमी गुरुवार (दि.24 जुलै )रोजी सकाळी प्रकाशित होताच. याची वरिष्ठांनी दखल घेत अंगणवाडीची जागा तात्काळ बदलण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी पालक व गावकऱ्यातून तेरणेचा छावाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
0 Comments