Subscribe Us

येडेश्वरी मंदिर परिसरात भाविक महिलेचे 2 लाखाचे दागिने हिसकावून चोरटे पसार.


.                                             संग्रह चित्र
येरमाळा/तेरणेचा छावा:-
येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर परिसरात देवी दर्शनाला आलेल्या पुणे येथील भाविक महिलेच्या गळ्यातील 50 ग्रॅम वजनाचे अंदाजे दोन लाखाचे दागिने तोडून घेतल्याची घटना रविवार (दि. 20 जुलै) रोजी संध्याकाळी 06:30 सुमारास घडली आहे.त्यामुळे येडेश्वरी मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
      याविषयी सविस्तर वृत्त असे की 
रंजना पोपट जाधव, वय 63 वर्षे, रा. बोरी बु. ता. जुन्नर  जि. पुणे या व त्यांचे बहिण येडेश्वरी मंदीरात दर्शनासाठी आल्या असता दि.20 जुलै रोजी सायंकाळी 06:30  वा. सु. मंदीर परिसरातील मंदीराच्या समोरील पश्चिम बाजुकडील डोंगराळ भागात घनदाट जंगलात रंजना जाधव या नैसर्गिक विधीसाठी गेल्या असता अज्ञात व्यक्तीने रंजना जाधव यांचे गळ्यातील 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 2,00,000₹ किंमतीचे तोडून घेवून पळून गेल्याची तक्रार रंजना जाधव यांनी दि.20 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 304 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
    त्यामुळे येडेश्वरी मंदिर परिसरात ग्रामस्थांनी व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलण्याची मागणी येडेश्वरी भक्तातून होत आहे.

Post a Comment

0 Comments