Subscribe Us

211 नॅशनल हायवे मलकापूर-दहिफळ-मोहा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरूच,अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत!

राजकीय वरदहस्त की अधिकाऱ्यांची मिलीभगत!



तेरणेचा छावा/धाराशिव:- 

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील मोहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे.काही ठिकाणी रस्ता उकरून काढला आहे.त्यावर मुरूम टाकला आहे. परंतु या मुरुमाचा दर्जा काय आहे येथे  प्रत्यक्ष येऊन पाहिल्यावरच कळणार आहे. मातीयुक्त मुरूम असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे मोटर सायकलवरून प्रवास करणाऱ्यांना येथे रोडशी कुस्ती करूनच जावे लागते. मोटारसायकलवरून जाताना अनेक प्रवासी घसरून पडल्यामुळे कोणाच्या हाताला, पायाला ,डोक्याला इजा झालेली आहे. 
       211 नॅशनल हायवे मलकापूर पाटी ते सापनाई  दहिफळकडे येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण पावसात झाल्यामुळे रोड पूर्णपणे उकरून निघत आहे. पावसात रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक नेते मंडळींनी मात्र याकडे कशासाठी दुर्लक्ष केलेली आहे हे समजण्या इतपत नागरिक दूधखुळे नसल्याची चर्चा ऐकावयास येत आहे.  
      दहिफळ गावातील चौरस्त्यापासून भातलवंडे वस्ती पर्यंत सिमेंट रस्ता होणार आहे.परंतु सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.पावसाचे पाणी साचले आहे. काम करून घेताना कोणीही त्याकडे लक्ष न दिल्यामुळे शासनाचे करोडो रुपये मातीमोल होणार आहे. आणि लवकरच रस्त्याची दुरावस्था ही होणार आहे. चिखल झाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.अनेक नागरिक गाडी घसरून पडले आहेत.कुणाचा हात मोडला आहे तर कुणाला डोक्याला मार लागला आहे.तर कुणाच्या पायाला जखम झाली आहे.
तसेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक,गावकरी यांना या मार्गावर प्रवास करावा लागतो.अनेक दिवसांपासून काम सुरू आहे.अद्याप पर्यंत ते चालूच आहे.पडलेले खड्डे तसेच आहेत.ज्या गुत्तेदाराने काम घेतले आहे.तो गेला कुठे? की स्थानिक पुढाऱ्यांशी काही  हातमिळवणी केली असा सवाल नागरिक करत आहेत.
     कारण स्थानिक पुढारी गप्प का आहेत की यांचेही काही संगणमत आहे की काय.असाही चर्चेचा सूर नागरिकांतून ऐकायला येऊ लागला आहे.

प्रतिक्रिया-
 याविषयी तेरणेचा छावा कडे कैफियत मांडताना सांगितले की दहिफळ मोहा रस्त्यावर सतत चिखल असतो.या मार्गावर प्रवास करायला भिती वाटत आहे.अनेकजन घसरून पडले आहेत.आमच्या घराकडे ये जा करण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे.आमची नागरिक म्हणून प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता लवकर तयार करावा.लोकांचा जीव धोक्यात घालू नका.
गुत्तेदार कुणी का असेना तो का वेळ लावतोय याची चौकशी केली पाहिजे.
-रंजना कदम (दहिफळ.ता.कळंब) रहिवासी.

Post a Comment

0 Comments