परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच खात्यातील लाचखोरी शिरली असून, आज त्यांच्या खात्यातील शशिकांत उबाळे अभियंत्याला 9 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
धाराशिव जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा अभियंता शशिकांत उबाळे यांना 9 हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. बसस्थानकातील एका गाळ्याचा अनधिकृत दरवाजा बंद करण्यासाठी ही लाच देण्यात येत होती.
अभियंता असणारे उबाळे हे कामाच्या बदल्यात लाच मागत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून आज सकाळी अकरा वाजता एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कारवाई केली. ही घटना राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याच कार्यक्षेत्रात घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून उबाळे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.धाराशिव जिल्ह्यातील बस स्थानक कामासाठी कोट्यावधी रुपये जमा केल्याचा आरोप या अभियंतावर करण्यात येत होता. धाराशिव तुळजापूर बस स्थानक कोणत्या न कोणत्या प्रकारे वादात सापडले आहे. धाराशिव बसस्थानकातील एक अनधिकृत काम जे ह्या अभियंताच्या देखरेकी खाली करण्यात आली होते. तो अनधिकृत दरवाजा बंद करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तीकडून लाच घेतल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याच जिल्ह्यात त्यांच्याच खात्याचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापणार आहे.
धाराशिव येथील बस स्थानकातील बोगस कामाच्या विरोधात पत्रकारांनी अक्षरशः रान उठवून ही या अभियंत्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे या लाचखोर अभियंत्याला वरिष्ठांचे पाठबळ तर नाही ना? अशी संशयाची सुई नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बसस्थानकातील संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
0 Comments