Subscribe Us

पालकमंत्री प्रताप सरनाईक १९ व २० जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यात.डीपीडीसी स्थगित निधी निर्णयाकडे जिल्हावाशियांचे लक्ष.

तेरणेचा छावा/धाराशिव:-  परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १९ व २० जुलै रोजी दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा नियोजन समिती निधी स्थगितीवर काही  तोडगा निघणार याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे. 
     याविषयी सविस्तर वृत्त असे की जिल्हा नियोजन समिती 2024 25 या निधीवर स्थगिती असून त्यामुळे जिल्ह्यातील  विकास कामे खोळंबली असल्याने जिल्हावाशीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती स्थगित विषय निधी विषयी काही सकारात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री जिल्ह्यात येतील अशी आशा जिल्हा वाशियातून निर्माण झाली आहे. 
   पावसाळी अधिवेशन काळात पत्रकारांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 2024 25 स्थगित निधी विषयी प्रश्न विचारला असता पालकमंत्र्यांनी याच अधिवेशन काळात स्थगिती उठवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे जिल्हावाशियातून या निर्णयाकडे आतुरतेने पाहिले जात आहे.
     शनिवाद १९ जुलै रोजी सोलापूर विमानतळ येथून सकाळी ११:१५ वाजता धाराशिवकडे प्रयाण.दुपारी १२;१५ वाजता धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील राखीव वन येथे हरित धाराशिव अभियानाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती.दुपारी २:१५ वाजता शिंगोली येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवकडे प्रयाण.दुपारी २:२० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन व राखीव. दुपारी २:४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय वाहनाने उमरगाकडे प्रयाण.दुपारी ४:४५ वाजता उमरगा येथे आगमन व उमरगा बसस्थानक नुतनीकरण कामाचे भूमिपूजन.सायंकाळी ५ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट.सायंकाळी ५:१५ वाजता उमरगा येथून शासकीय वाहनाने मुरुम ता.उमरगाकडे प्रयाण. सायंकाळी ५:३५ वाजता मुरुम ता.उमरगा येथे आगमन व मुरुम बसस्थानक नुतनीकरण कामाचे भुमिपुजन.सायंकाळी ६:१५ वाजता  महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट.सायंकाळी ६ : ३० वाजता मुरुम ता.उमरगा येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण व मुक्काम. 
    रविवार २० जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी ७:५० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर ता.तुळजापूर येथे आगमन व अभिषेक पूजा.सकाळी ९:४५ वाजता पोलीस अधिक्षक,धाराशिव व इतर पोलीस अधिकारी यांचे समवेत आढावा बैठक.सकाळी १०:४५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर ता.तुळजापूर येथून शासकीय वाहनाने नळदुर्गकडे प्रयाण.सकाळी ११:३० वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ला पाहणी.दुपारी १२: ३० मिनीटांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथून शासकीय वाहनाने जेवळी ता.लोहाराकडे प्रयाण.दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ आयोजित वृक्षारोपण सोहळ्यास उपस्थिती.जेवळी ता.लोहारा येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण करतील. त्रास सहन करावा लागत आहे.
        शनिवाद १९ जुलै रोजी सोलापूर विमानतळ येथून सकाळी ११:१५ वाजता धाराशिवकडे प्रयाण.दुपारी १२;१५ वाजता धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील राखीव वन येथे हरित धाराशिव अभियानाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती.दुपारी २:१५ वाजता शिंगोली येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवकडे प्रयाण.दुपारी २:२० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन व राखीव. दुपारी २:४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय वाहनाने उमरगाकडे प्रयाण.दुपारी ४:४५ वाजता उमरगा येथे आगमन व उमरगा बसस्थानक नुतनीकरण कामाचे भूमिपूजन.सायंकाळी ५ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट.सायंकाळी ५:१५ वाजता उमरगा येथून शासकीय वाहनाने मुरुम ता.उमरगाकडे प्रयाण. सायंकाळी ५:३५ वाजता मुरुम ता.उमरगा येथे आगमन व मुरुम बसस्थानक नुतनीकरण कामाचे भुमिपुजन.सायंकाळी ६:१५ वाजता  महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट.सायंकाळी ६ : ३० वाजता मुरुम ता.उमरगा येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण व मुक्काम. 
   रविवार २० जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी ७:५० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर ता.तुळजापूर येथे आगमन व अभिषेक पूजा.सकाळी ९:४५ वाजता पोलीस अधिक्षक,धाराशिव व इतर पोलीस अधिकारी यांचे समवेत आढावा बैठक.सकाळी १०:४५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर ता.तुळजापूर येथून शासकीय वाहनाने नळदुर्गकडे प्रयाण.सकाळी ११:३० वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ला पाहणी.दुपारी १२: ३० मिनीटांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथून शासकीय वाहनाने जेवळी ता.लोहाराकडे प्रयाण.दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ आयोजित वृक्षारोपण सोहळ्यास उपस्थिती.जेवळी ता.लोहारा येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण करतील. अशाप्रकारे पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम आहेत.

Post a Comment

0 Comments