Subscribe Us

तक्रार करूनही प्रशासन मात्र सुस्त.गुत्तेदार आणि अधिकारी मिलीभगत? नागरिकांचा आरोप.


तेरणेचा छावा/धाराशिवः-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे विविध विकासकामाअंतर्गत  20ते 22 कोट्यावधी रुपयांची कामे चालू आहेत परंतु ही कामे दर्जाहीन व निकृष्ट होत असल्याची तक्रार संबंधित विभागाकडे असताना याविषयी वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झालेल्या असतानाही निकृष्ट कामे मात्र जशीच्या तशीच आहेत. त्यामुळे गुत्तेदाराने अधिकाऱ्यांनी मिलीभगत केली की काय असावा ग्रामस्थातून ऐकावयास मिळत आहे.
   दहिफळ येथील शेतरस्ते, सिमेंट रस्ते,पेवर ब्लॉक बसवणे,यासह विविध विकासकामे चालू आहेत परंतु काही बहुतेक कामे निकृष्ट दर्जाची अर्धवट उरकूनच बिल मात्र संपूर्ण उचलल्याची जोरदार चर्चा गावकऱ्यातून बोलली जात आहे.
       पेवर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे व तुटलेले एका लेवल मध्ये न बसवता खाली वर बसवले , सिमेंट रस्ते करून दोन ते तीन महिने झाले असताना रस्त्यावरील खडी उघडी पडून खड्डे पडत आहेत,तसेच मोठ्या मोठ्या भेगाही पाहावयास मिळतात.सर्रास कामावर कोणत्या योजनेतून हे काम झाले आहे  त्याची इस्टिमेट व मुदत किती याचे बोर्डही पहावयास मिळत  नाहीत.   
  काही ठिकाणच्या शेत रस्त्याच्या कामाचा तर दर्जा पाहायलाच नको. शेत रस्ता करायच्या आधी ती जागा व्यवस्थित होती परंतु शेत रस्ता केल्यावरच खराब झाली असल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळेल तसेच शेत रस्त्याची नेमके रुंदी किती लांबी किती त्यावरील टाकायचे मटेरियल काय हे तर विचारायलाच नको,तसेच रस्ता करत असताना पाण्यासाठी चारी खोदणे,नळी टाकणे, हे कुठे पहावयासही मिळत नाही.यामध्ये आणखीही बरीच अनियमितता  पहावयास मिळते.
    अशा प्रकारची कामे जर होत असतील तर प्रशासन काय नुसतं? अशा प्रकारची लोकभावना ऐकावयास येत आहे. तसेच करण्यात आलेली कामे अशा प्रकारची झालेली आहेत. त्यामुळे निकृष्ट प्रकारची कामे उरकून घेऊन शासनाच्या कोट्यावधी रुपयांना गंडा घालण्याचे काम झालेले आहे. अशा प्रकारची बोगस कामे करत असताना प्रशासन मूग गिळून गप्प का होते, ज्यांची जबाबदारी होती त्यांनी दर्जेदार कामे का करून घेतली नाहीत. तसेच या कामात अधिकाऱ्यांची काही आर्थिक देवाण-घेवाण झाली की काय! कारण तेरीबीचुप आणि मेरीबिचुप भूमिका कशासाठी आहे. कारण ग्रामस्थांनी ग्रामसभेत याविषयी तक्रार करून सुद्धा याची ना प्रशासनाने ना संबंधितांनी दखल न घेतल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच अशा प्रकारची बोगस कामे करून शासनाची लुटमार व दिशाभूल करणाऱ्या संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे.
  अशा भ्रष्ट कामास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार पालकमंत्री कडे करणार असल्याची ग्रामस्थातून सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments