Subscribe Us

नॅशनल हायवेवर तेरखेडा गावाजवळ 2 लाख 72 हजार177 रुपयांचे कपड्याचे कार्टून बॉक्स पळवले.


.                                           संग्रहचित्र
तेरणेचा छावा/धाराशिव:- 
      याविषयी सविस्तर वृत्त असे की सुरत कडून हैदराबाद कडे जाणाऱ्या मोहम्मद छितर हनीफ, वय 46 वर्षे, रा. अन्द्रोला ता. हतीन जि. पलवल राज्य हरियाणा हे आयशर ट्रक क्र टीएस 07 यु 0625 मध्ये  हैद्राबाद कडे माल भरुन जात असताना  दि.10 जुलै रोजी सायंकाळी 06.00वा.सु.एनएच 52 हायवे रोडवर तेरखेडा गावाजवळ एच पी पेट्रोपंपा समोर अज्ञात 5 व्यक्तीने ट्रकची ताडपत्री फाडून एक कपड्याचा बॉक्स, क्लॉथ लेबल असलेला एक कारटुन बॉक्स, प्रिंटेड सारीज लेबल असलेला एक कारटुन बॉक्स, डी. नं 2031 बॉक्स लेबल असलेला एक कारटुन बॉक्स, क्लॉथ लेबल असलेला एक काटुन बॉक्स, ॲपल जॉर्जटे लेबल असलेला एक कारटुन बॉक्स असे मिळून आठ कार्टून बॉक्स  एकुण 2,72,177₹ किंमतीचा माल चोरुन नेला. त्यावेळी मी घाबरलोली अवस्थेत असल्यामुळे ट्रक तेथे न थांबवता पुढील धाब्यावर गाडी थांबवुन पाहिल्यानंतर ताडपत्री फाडून कपड्याचे 8 कार्टून बॉक्स चोरी गेल्याचे निदर्शनास आले अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहम्मद हनीफ यांनी दि.24.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(ब), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
      कपड्याच्या बॉक्सची चोरी 10 जुलैला झालेली असताना  तक्रार 24 जुलै रोजी दाखल करण्यात आल्याने. तक्रार दाखल उशिरा का करण्यात आली याविषयी नागरिकातून वेगळीच चर्चा ऐकावयास आहे.

Post a Comment

0 Comments