तेरणेचा छावा/धाराशिव:-
नॅशनल हायवे 211 मलकापूर पाटी सापनाई दहिफळ मोहा या रस्त्याच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 16 कोटीच्या आसपास काम असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा चालू असतानाही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
हे काम गेल्यावर्षी मंजूर झालेलं असतानाही कामात अत्यंत दिरंगाई व निकृष्ट दर्जाचे काम करत असून कामाच्या इस्टिमेट प्रमाणे काम होत नसल्याच्या तक्रारी पंतप्रधान सडक योजना या कार्यालयाकडे दाखल केलेल्या असतानाही वेळ मारून नेत काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत आहे.परंतु हे काम अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन झालेले असून काम पुढे चालू आणि मागे रस्त्यावर खड्डे पडू लागली आहेत तसेच रस्त्यावरील खडी उघडी पडत आहे. त्यामुळे नेमकं काम नागरिकासाठी आहे की अधिकारी ,गुत्तेदारासाठी आहे असा प्रश्न जनतेतून बोलला जात आहे. रस्त्याचे डांबर काम भर पावसात केलेले असल्यामुळे रोड लगेच मागून उकरून निघत आहे, खडीत डांबर टाकली की ऑइल टाकले असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. हा रस्ता मुख्य दळणवळणाचा असल्यामुळे या रस्त्याचे काम इस्टिमेट प्रमाणे व क्वालिटीचे होणे गरजेचे असतानाही काम अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाचे झालेले आहे. याविषयी नागरिकांनी वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे फोनद्वारे ,अर्जाद्वारे तक्रारी दिलेल्या आहेत. कामाची गुणवत्ता अशीच राहिली तर रस्ता लगेच पूर्णपणे उकडून खराब होणार आहे त्यामुळे नागरिकांना या रस्त्याचा नाहक त्रास होणार असल्याने नागरिक आता आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित विभागाने या कामाकडे आता तरी त्वरित लक्ष देऊन काम इस्टिमेट प्रमाणे व गुणवत्तापूर्ण करून घ्यावे.अन्यथा नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
कामाच्या तक्रारी आल्यानंतर कामावर पाहणी केली. काम खराब असल्याचे निदर्शनास आलेले असून संबंधित गुत्तेदारा ते काम डबल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
एस एस सय्यद
कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना धाराशिव
0 Comments