Subscribe Us

सहकारी पतसंस्थासाठी येरमाळा येथे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर


तेरणेचा छावा/धाराशिव:-
सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जनहित पतसंस्था येरमाळा यांच्या वतीने दि 28 /06/ 2025 ते 29 / 06/ 2025 वार शनिवार व रविवार रोजी सहकारी संस्थांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
    या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन शनिवारी (दि.28 जून )रोजी सकाळी10:30 वाजता  बालाजी एच सावतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कळंब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रा. संतोष तौर निमंत्रीत सदस्य महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था मुंबई तथा सहकार भारती लातूर सहविभाग प्रमुख राहणार आहेत तसेच प्रमुख पाहूणे  बी.जे. ठोबरे प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व उपप्राचार्य जी ए जाधव सर हे राहणार आहेत तर तज्ञ व्याखाते  एन एन कुलकर्णी हे संचालक व कर्मचारी यांना विविध कर्ज वाटप करताना घ्यावयाची दक्षता व कागदपत्रे , वसुली कायदा व अडथळे ठेवी स्विकरताना घेतली जाणारी काळजी व कागदपत्रे 97 व्या घटना दुरुस्ती व संचालक व सभासद यांच्या जवाबदाऱ्या नियमक मंडळ इ विषयावर व्याख्यान होणार आहे.       
    यावेळी सहभागी संस्थाच्या प्रतिनिधीना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व सहकारी पतसंस्थानी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जनहित पतसंस्था येरमाळा शाखा व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments