काहीजणाकडून गावात अफवा पसरवून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न!
धाराशिव /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे तीर्थक्षेत्र पर्यटनाला आलेला निधी त्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. यासाठी गावातील ग्रामस्थ ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळी दुसऱ्या दिवशी कळंब गटविकास अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या लेखी हमीवर उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने तहसील कार्यालयामार्फत तातडीची फी भरून १२ डिसेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयालात जमा केली होती . त्यानंतर 16 डिसेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयाने ऑनलाइन 22 डिसेंबर ही मोजणीसाठी तारीख दिली होती. परंतु कार्यालयाने त्या तारखेत खडाखोड करून 15 जानेवारी अशी दुसरी नोटीस तयार केली होती, याविषयी विचारणा केल्यानंतर ग्रामसेवक यांनी तारीख बदलली असल्याचे भूमि अभिलेख कार्यातून सांगण्यात आले होते परंतु यानंतर सर्व प्रसार माध्यमात ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने तिसरी नोटीस काढून29 डिसेंबर ही तारीख दिली होती त्याप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व ग्रामपंचायत कार्यालयाचे दोन शिपाई यांनी मंदिर परिसरातील गट नंबर 188 व त्याच्या लगत असलेल्या राजेभाऊ पाटील व भाऊसाहेब पाटील यांच्याही गटाची मोजणी केली. मोजणी झाल्यानंतर अति तात्काळपणे कार्यालयीन काम पूर्ण झाल्यानंतर श्री खंडोबा मंदिर परिसरातील पूर्ण जागेची हद्दीवर खुणा करणार असल्याचे सांगितले.
काही मंडळी ग्रामस्थात विनाकारण गैरसमज पसरण्याचे काम करत आहेत
श्री खंडोबा देवाचे मानकरी व ग्रामस्थांचे उपोषण फक्त खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाला बसले असताना ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच ,ग्रामसेवक व काही सदस्य उपोषण स्थळावर येऊन आम्हाला पूर्ण 188 गट नंबर वरील अतिक्रमण काढायचे आहे असे म्हणाले, यावर आम्हाला दुसरीकडील काहीही देणंघेणं नाही असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं असतानाही. काहीजण गावातील अतिक्रमण पूर्ण काढायचे आहेत जिल्हा परिषद रोडच्या कडेची अतिक्रमण काढायचे आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडच्या कडेची अतिक्रमण काढायचे आहेत चौरस्तावरील अतिक्रमणे काढायचे आहेत असे सांगून लोकांमध्ये गैरसमज पसरण्याचे काम करत आहेत. म्हणजे असं झालं माझं काढलं म्हणजे सगळ्याच निघाला पाहिजे या कू भावनेने काही मंडळी अफवा पसरवत आहेत, परंतु ही मंडळी लक्षात का घेत नाही की यांची अतिक्रमणे मंदिरा परिसराला अडचण होत असल्यामुळे रिकामी करावी लागत आहेत दुसऱ्या ठिकाणच्या अतिक्रमणाची काहीही अडचण नाही. तरीही मंडळी ग्रामसेवकांना संबंधित कार्यालयाकडे अर्ज देण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे कोणाचे तरी खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच किती शहाना आहे असे दर्शविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारे काहीजण व्यवसायिकामध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडण्याचे काम करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
0 Comments