थाराशिव /तेरणेचा छावा:-
मराठा आरक्षणासाठी बलीदान देत आहे.सरकारने जागे व्हावे.आरक्षण द्या आत्महत्या करण्यापूर्वी तरूणाने चिठ्ठी लिहून ठेवली.
दहिफळ परिसर हळहळला!
मराठा आरक्षणासाठी समाजातील मराठा तरुण आक्रमक बनत असून काही युवक मराठा आरक्षणामुळे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याच्या कारणाने नैराश्यात जाऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सरकारला नेमके आणखी किती बळी घ्यायचे आहेत अशी लोकभावना तयार होत आहे.
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गुरुवार (दि ४ जानेवारी) रोजी सायंकाळी 07:00 च्या सुमारास रोहण राजेंद्र भातलवंडे या १९ वर्षाच्या मराठा तरुणाने चिठ्ठी लिहून
शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
याबाबत वृत्त असे की,दहिफळ येथील तरुण रोहण राजेंद्र भातलवंडे हा .१० वी पर्यंत शिक्षण घेऊन कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे.नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही. म्हणून
गावात दुधडेअरीचा व्यवसाय सुरू केला.दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वतः च्या तीन गायी सांभाळत होता. शिक्षणासाठी इतका खर्च होऊनही आपण शेवटी काय करतोय अशा विचाराने तो सतत बेचेन असायचा. निसर्गाच्या जीवावरची शेती अन बेभरवशाचा द्दुधाचा व्यवसाय
दुधाचे दर कमी-जास्त होत होता.या व्यवसायात नफा कमी तोटा अधीक होत आहे हे लक्षात आले.आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला.कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही.जर आरक्षण असते तर आणखी शिक्षण घेऊन कुठंतरी संधी मिळाली असती. जवळच्या मित्रा जवळ बोलत तो सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता.
दहिफळ येथे दि ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती.आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत आहेत.अखेरची लढाई सुरू आहे.सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे यासाठी दबाव वाढत आहे.आंदोलने होत आहेत.सकल मराठा समाज एकवटला आहे.आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.त्यांच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी गावात बैठक घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व तयारी झाली आहे.
बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुःखद घटना घडली आहे.मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत आहे.सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे असा मजकूर लिहून रोहण राजेंद्र भातलवंडे याने गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे.तर युवक हताश होऊन गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत.
सरकारचे अपयश आहे.तरुणांना पुरक व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यास कमी पडले आहे.शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार म्हणून फिरावे लागत आहे.हताश होऊन अनेक तरुण युवक आपले जीवन संपवित आहेत.
मराठा आरक्षणासाठी दहिफळ येथील पहिला बळी गेला आहे.
दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रोहण राजेंद्र भातलवंडे याने चिठ्ठी लिहून गळफास घेतला आहे.
गायीचे दूध काढून चिठ्ठी लिहून आपले जीवन संपविले आहे.ही घटना परिसरात कळाली सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये दत्ता नानासाहेब भातलवंडे यांनी फिर्याद दाखल केली भातलवंडे यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावकरी नातेवाईक उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलत आत्महत्याग्रस्त युवकांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देण्याची गरज समाजातून व्यक्त होत आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करून मराठा युवकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे . परंतु नुकताच वयात आलेला मुलगा मराठा आरक्षणाच्या सरकारच्या घोळघालू धोरणामुळे बळी गेल्याने भातलवंडे कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे, या घटनेमुळे दहिफळ व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments