धाराशिव /तेरणेचा छावा:-
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मुंबई पायी दिंडीत सहभागी होवून ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळेपर्यंत साथ देण्याचा निर्धार धाराशिव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच धाराशिव येथील शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत 1 जानेवारीला सकल मराठा समाज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार येणार असल्याचे सर्वांना सगण्यात आले.
या वेळी गावोगावी जाऊन वातावरण निर्मिती साठी कोअर टीम ची निर्मिती करण्यात येणार आहे. सोमवार (दि. 1 जानेवारी) रोजी मराठा समाज संपर्क कार्यालय फूड विल्ला छत्रपती संभाजी महाराज चौपाटी जवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, 20 जानेवारी रोजी निघणाऱ्या मुंबई आरक्षणाच्या, पायी दिंडी मध्ये सहभागी होणाऱ्याची संख्या निश्चित करण्यासाठी फार्म भरून घेतला जाईल त्यांचे वाहन संख्या,इतर साहित्य याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येइल.पुढील आठवड्यात मोठया प्रमाणावर जिल्हास्तरीय बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे,
तुळजाभवानीच्या आशीर्वादासह ज्योत घेवून धाराशिवकर मोठया संख्येने आरक्षणाच्या पायी दिंडीत सहभागी होणार असल्याचे या वेळी ठरले. या बैठकीला तालुक्यातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी सोमवार दि.1 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सकल मराठा समाज संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाज बैठकीत करण्यात आले आहे.
0 Comments