Subscribe Us

कळंब भूमी अभिलेख कार्यालयाचा सावळा गोंधळ!



धाराशिव /तेरणेचा छावा:-
कळम येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून या गोंधळामुळे नेमकं कार्यालयामध्ये चाललय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे
         याविषयी सविस्तर वृत्त असे की दहिफळ येथील खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी खंडोबा मंदिराचे मानकरी व ग्रामस्थ 30  नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. यावेळी गटविकास अधिकारी यांनी एक महिन्यात अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी लेखी हमी देऊन उपोषण सोडवले होते त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय 12  डिसेंबर रोजी अतितातडीची मोजणीसाठी  तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे तहसील कार्यालयामार्फत शासकीय फीची भरणा करून केला, त्या कार्यालयीन फीस भरून अर्ज केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने 16 डिसेंबर रोजी ऑनलाइन 22 डिसेंबर ही खंडोबा मंदिर परिसर 188 गट क्रमांक मोजणीसाठी तारीख दिली.परंतु कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परस्परच खोडाखोड अरुण 15 जानेवारी 2024 ही तारीख केली. वास्तविक  संवेदनशील मुद्द्यासाठी अति तात्काळची कार्यालयाची फी भरलेली असतानाही नेमके कोणाच्या सांगण्यावरून ही तारीख वाढवून दिली असा प्रश्न ग्रामस्थातून विचारला जात आहे अथवा यात काही आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याची चर्चा ही गावकऱ्यातून एकावयास येत आहे. त्यामुळे कार्यालयाच्या या अशा बेजबाबदार कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील समाजसेवकातून होऊ लागली आहे. याविषयी कार्यालयाकडे विचारणा केली असता आपल्या गावचे ग्रामसेवक ट्रेनिंग साठी जात असल्याने पुढील तारीख दिल्याचे सांगितले परंतु इतक्या दूरवरची तारीख कोणाच्या सांगण्यावरून दिली असे विचारले असता अधिकाऱ्याची भंबेरी उडाली व आपण व ग्रामसेवक मंगळवारी कार्यालयात या आपणास जवळची तारीख देतो असे सांगितले. त्यामुळे भूमिलेख अभिलेख कार्यालयात नेमकं कार्यालयीन कामकाज कसं चालतं हे या गोष्टीवरून दिसून येत आहे तसेच सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्याची हे कार्यालय कशी पिळवणूक करीत असेल, हे न विचारलेलच बरं!
  त्यामुळे अशा बेजबाबदार कार्यालयातील कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण इशारा खंडोबाचे मानकरी व ग्रामस्थांनी बोलताना दिला आहे..

Post a Comment

0 Comments