दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली.दरसालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा कमिटीने मोठी तयारी केली होती परंपरेनुसार चालत आलेल्या रूढीप्रमाणे विधिवत कार्यक्रम पार पडले .
राजे ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते.सकाळी ९ वाजता गावातुन प्रसाद वाजत गाजत मिरवणून खंडोबा देवाला प्रसाद दाखविण्यात आला.व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळी ११ वाजता पाटील यांचा नैवेद्य वाजत गाजत दाखविण्यात आला.तसेच मुख्य मानाचा नैवेद्य सुतार समाजाला असतो.वारुवाले , देवाच्या काटीचे मानकरी ,हलगीवाले , लेझीम पथक, नृत्यांगना यांच्या उपस्थितीत खंडोबा देवाला नैवेद्य दाखविण्यात आला.
नैवेद्य दाखविण्यात आल्यानंतर खंडोबा मंदिरातून मानाचे दोन लंगर गावातून मिरवणूक काढण्यात येते.यावेळी तुकाराम भातलवंडे व भैय्या भुसारी यांच्या हस्ते लंगर तोडण्यात आले.धार्मिक विधीवत पूजा करून गावातून लंगर मिरवणूक काढली.यावेळी भाविकभक्तांनी एकच गर्दी केली होती.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन्ही लंगर एकाच वेळी तोडण्यात आले.लंगर तुटल्या नंतर यळकोट यळकोट घे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.भाविकांनी खोबरं भांडारा उधळून आनंद व्यक्त केला.
लंगर तुटल्या नंतर देवाचा रथ म्हणजेच लाकडी गाडा बगाडा मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला.मंदिराला पाच वेढे मारण्यात आले.
यात्रेत लहान मुलांसाठी खेळणीची दुकाने ,नारळ भांडार विकणारे यांची दुकाने लावण्यात आली होती . तसेच रहाट पाळणा, घसरगुंडी ,जाळीवरील उड्या,गोल फिरणारी गाडी, यामुळे यात्रेला चांगली रंगत आली.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा यात्रा शांततेत पार पडली.
यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा समिती अध्यक्ष चरणेश्वर पाटील, समाधान मते, बालाजी मते, सुधीर मते, प्रदिप भातलवंडे, प्रशांत भातलवंडे, रामेश्वर भातलवंडे, प्रवीण पाटील,शंकर मते,मोहन भातलवंडे,,डिगांबर भातलवंडे, सदाशिव मते, नारायण भातलवंडे बापूराव मते ,अभिनंदन मते, शिव शंकर भातलवंडे अदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.. यात्रेत भाविकांसाठी पाण्याची मुबलक सोय तसेच 108 ॲम्बुलन्स हजर होती.
अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर
यावर्षीहीही अतिक्रमणामुळे धार्मिक कार्यक्रम व विविध कार्यक्रमाला मोठी अडचण येत होती..अगडबगडा कार्यक्रमादरम्यान गर्दीमुळे दोन भाविक जखमी झाले आहेत गेल्या वर्षी याच कार्यक्रमात एका गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच अतिक्रमणामुळे रात्री तुझ्यात जीव रंगला या मनोरंजन कार्यक्रमाला जागा कमी पडू लागल्यामुळे कार्यक्रमात अनेक वेळा अडथळा येत होता. अनेक वेळा कार्यक्रम बंद करावा लागला होता. त्यामुळे खंडोबा मंदिर परिसर लवकरात लवकर अतिक्रम मुक्त व्हावा अशी भावी खातून व गावकऱ्यातून चर्चा एकावयास येत होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर सक्षम वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे जखमींना धाराशिव येथे हलवण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्रातील या प्रकारामुळे ग्रामस्थांनी वरिष्ठाकडे तक्रार नोंदवून नाराजी व्यक्त केली यावेळी ग्रामस्थ मोठ्या आक्रमक झाले होते..
0 Comments