Subscribe Us

आमरण उपोषणाचा ६ वा दिवस प्रकृती खालावली,:३० तरूणांनी मुंडन करून केला सरकारचा जाहीर निषेध


 
दहिफळ/ तेरणेचा छावा:-
आमदार कैलास पाटील यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला.

जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही.
       कळंब तालुक्यातील दहिफळ येथील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण  सोमवार दि.4 सप्टेंबर पासून  किरण भातलवंडे यांनी सुरू केले.
उपोषणाचा सहावा दिवस आहे.गेल्या सहा दिवसांपासून किरण भातलवंडे यांनी अन्नाचा त्याग केला आहे.प्रकृती खालावली असून डॉ सुजीत राऊत यांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.परंतु जोपर्यंत जरांगे पाटील हे उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार केला आहे.
शासनाने काढलेला तोडगा हा फक्त पळवाट आहे.जरांगे पाटील यांनी सरकट ओबीसी आरक्षण जाहीर करावे तरच मी उपोषण मागे घेईल.अन्यथा जीव असे पर्यंत लढा कायम सुरू राहील असे सरकारला ठणकावून सांगितले आहे.
गावोगाव तरुण पाठिंबा देण्यासाठी उपोषण करत आहेत.
जिल्ह्यातील पहिला पाठिंबा देण्यासाठी दहिफळ येथे किरण भातलवंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.गावातील ३० तरुणांनी मुंडन करून किरण भातलवंडे यांना पाठिंबा दिला आहे.लवकर निर्णय घ्या अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुंडन करून सरकारचा जाहीर निषेध केला आहे.
कळंब धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी दि ८सप्टेंबर रोजी सायंकाळी आकाराच्या सुमारास दहिफळ येथे येऊन किरण भातलवंडे यांची भेट घेतली.
उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले आहे परंतु सरकार निर्णय देण्यास सकारात्मक नाही.निजामकालीन पुरावे असले तर कुनबी मराठा म्हणुन ओबीसी तून आरक्षण मिळेल असा निर्णय दिला आहे.हा निर्णय निव्वळ पळवाट आहे.निजामकालीन पुरावे जिल्हात तोडके सापडले आहेत.वंशावळ वगळून सरकट ओबीसी आरक्षण जाहीर करावे अशी आमची मागणी आहे.
किरण भातलवंडे यांनी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.सहा दिवस उपाशी राहून जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.जरांगे पाटील यांच्या पर्यंत उपोषणाचा विषय गेला आहे.उपोषण मागे घ्या असा सल्ला आमदार कैलास पाटील यांनी किरण भातलवंडे यांना दिला आहे.परंतु जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाहीत तोपर्यंत मी उठणार नाही असा निर्धार किरण भातलवंडे यांनी केला आहे. आई वडील भाऊ,मुलगा मुलगी,पत्नी मात्र काळजीत पडले आहेत.आंदोलन तिव्र होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments