येरमाळा/तेरणेचा छावा:-
धाराशिव जिल्ह्यातही जरंगे पाटील यांच्या उपोषणास वाढता पाठिंबा मिळत असून 4 सप्टेंबर पासून दहिफळ येथील किरण भातलवंडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत तर येरमाळा येथे दि.६ रोजी सांयकाळी ५ वा. मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा म्हणून येथील ग्रामपंचायत समोर साखळी उपोषण सुरवात केली असुन उपोषनासस वाढता पाठिंबा मिळत असुन येरमाळा येथिल दोन युवकांनी आमरण उपोषनास सुरवात केली आहे.
अतंरली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनात लाठीचार्ज झाल्या नंतर मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच तापले असून ठीक ठिकाणी विविध प्रकारे आंदोलनं होत आहेत.बुधवारी सायंकाळी ६ वाजता रोजी येरमाळा येथिल मराठा सुशिक्षित बेकार युवकांनी सकल मराठा मोर्चा ग्रुप च्या वतीने जरंगे यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू केले यास येथील लहुजी शक्ती सेना,मुस्लीम समाज,नाभिक महामंडळ,गुरव समाज,मातंग एकता समाज आदी संघटनेने साखळी उपपोषनास पाटींबा दर्शविला असुन येथिल अमोल बारकुर सर व तानाजी बारकुल यांनी आमरण उपोषनास सुरवात केली असुन जोपर्यत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषन सुरुच राहील असे उपोषणकर्ते यांनी सांगीतले.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 युवक 7 सप्टेंबर पासून मनोज जरंगे पाटलांच्या समर्थनात अमरण उपोषण सुरू केले आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण वातावरण गरम झालेली आहे त्यामुळे शासनाने सकारात्मक पावले उचलून मराठा आरक्षण देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
0 Comments