Subscribe Us

श्री येडेश्वरी देवस्थान मंजूर निधी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

येरमाळा /तेरणेचा छावा-:
    येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरासाठी राज्य पर्यटन विकास विभागाचा पाच कोटी निधी जाहीर झाला आहे.मंजूर निधीतून करण्यात येणाऱ्या कामासाठी जिल्हा अधिकारी सचिन ओंबसे यांनी प्रशासकिय व स्थानिक प्रशासनाच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते.धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीला प्रशासकिय अधिकारी,ग्राम पंचायत,देवस्थान ट्रस्टचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.  राज्य शासनाने नुकताच येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसर व पर्यटन विकासासाठी चार कोटी नव्वद लाख निधी जाहीर केला आहे.मंजूर निधितुन दीड कोटी नीधी उपलब्ध झाल्याने प्राप्त निधितून काय कामे करता येतील यासाथी संबंधित प्रशासकीय अधिकारी,ग्राम पंचायत प्रशासन,देवस्थान ट्रस्टची बैठक बोलावली होती.या बैठकीत पर्यटन विभागाच्या अंदाज पत्रक व प्रत्यक्ष आवश्यक कामे यात तफावत असल्याचे चर्चेतुन समोर अल्याने एक समिति नेमुन मंजूर निधितुन केली जानारी कामे ठरवून करण्याचे या बैठकित ठरले.मंजूर निधी सदरील कामे यात्रा पालखी रस्त्याची असल्याने हा निधी सार्वजनिक बांधकामाला विभागाला वर्ग करण्यात यावा असे माजी सरपंच विकास बारकुल यांनी संगीतले.
त्यावर दहा दिवसात समिती नेमून कामे ठरवून अहवाल सादर करावा असे जिल्हा अधिकारी सचिन ओंबासे यांनी आदेश दिले.
या बैठकीला सरपंच सुजाता देशमुख,उपसरपंच गणेश बारकुल,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापुसाहेब बेदरे,उपाध्यक्ष संजय अगलावे,ग्राम पंचायत सदस्य ट्रस्टचे सदस्य,गावतील प्रतिष्ठित,राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पर्यटन विभागचे अधिकारी,आमदार राणा जगजीतसिंह पाटील,यानी व्हीडिओ कॉन्फ्रसिंग द्वारे सहभागी होऊन अनेक मुद्यावर चर्चा केली तर येरमाळा हे गाव श्री येडेश्वरी मुळे राज्यात प्रसिद्ध असल्याने या ठिकाणच्या सुखसुविधा भाविकांना उत्कृष्ठ दर्जाच्या असाव्या यासाठी या बैठकीला महावितरणसह सर्वच प्रशासकीय विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना निमंत्रित केले होते,सर्वच विभागाला गावकऱ्यांच्या सूचनेनुसार रस्ते,वीज पुरवठा सुरळीत मिळावा यासाठी उपाय योजना केल्या जाव्या असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
खामगाव पंढरपूर रस्त्याच्या कामात येरमाळा गावात अनेक तक्रारी असल्याने एमएसआरडीसी चे उपअभियंता कोटेचा यांना चांगलेच धारेवर धरत गावकऱ्यांच्या सूचनेनुसार रस्ते,वीज पुरवठा करुन देण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments