धाराशिव/तेरणेचा छावा:-
जगातील सर्वात अवघड व खडतर समजल्या जाणाऱ्या पॅरिस येथील 1200 किलोमीटर अंतर पार करण्याच्या सायकलिंग स्पर्धेत 90 तास 3 मिनिटे व 50 सेकंदात हे अंतर पार करत स्पर्धेत बाजी मारली आहे.
उपळाई येथील रहिवास असलेले परंतु सध्या पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेले सुरज मुंडे यांना सायकलिंगची आवड असल्यामुळे ते वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत असतात त्यांनी पॅरिस येथील जागतिक मानाच्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले व त्यांनी भाग घेतला दर चार वर्षांनी ही स्पर्धा पॅरिसमध्ये होत असते यावर्षी स्पर्धा असल्याने त्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले पात्रता फेरीत सायकल पटूंना 1219 किमी हे अंतर पार करणे गरजेचे असते 80 ,84 व 90 विभागलेली असून या काळात स्पर्धकांना डोंगर चढउतार, ऊन ,वारा ,पाऊस झेलत हे अंतर पार करावे लागते. सुरज मुंडे यांनी हे अंतर 90 तास तीन मिनिटे व दहा सेकंदात पार करून धाराशिव जिल्ह्याचे नाव पॅरिसच्या सायकलिंग स्पर्धेत कोरलेले आहे.
त्याच्या या यशाबद्दल उपळाई येथील कंकालेश्वर पतसंस्था, सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुरज मुंडे यांचे अभिनंदन केले आहे
0 Comments