Subscribe Us

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ किरण भातलवंडेचे दहिफळ येथे आमरण उपोषण सुरू


जोपर्यंत जरांगे पाटील यांचे उपोषण मिटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही.

संभाजी ब्रिगेडचा पाठींबा.

दहिफळ/तेरणेचा छावा
     कळंब तालुक्यातील दहिफळ येथे खंडोबा मंदिरासमोर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गावातील किरण भातलवंडे या युवकाने सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रात्री 10:30 पासून आमरण उपोषण सुरू केले असून जोपर्यंत  जरांगे पाटील यांचे उपोषण मिटत नाही तोपर्यंत मी खंडोबा मंदिरासमोरून उठणार नाही असा ठाम निर्धार केला आहे.फेसबुक वर पोस्ट शेअर करून उपोषणाला सुरुवात केली.तसेच लेखी निवेदन सोशल मीडिया वर टाकण्यात आले होते.रात्री तीनच्या सुमारास येरमाळा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती पोलिस पाटील मनेश गोरे यांनी दिली.घटनास्थळी तंटामुक्ती अध्यक्ष तात्या भातलवंडे,मनेश गोरे उपस्थित होते.बीट अंमलदार चाफेकर यांनी भेट घेऊन वरिष्ठांना माहिती दिली.
  सकाळी गावातील युवकांना घटना समजताच शेकडो तरुण एकत्र आले व उपोषणाला पाठिंबा दिला.गावातील पुढारी, सरपंच उपसरपंच, सदस्य यांनी उपस्थिती लावली.एक मराठा लाख मराठा , छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने परिसर दणाणून गेला.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनला निवेदन दिले असून.
आंदोलन सुरू आहे.शेलगाव, पानगाव, बाभळगाव,बरमाची वाडी,मस्सा, उपळाई, तांदुळवाडी, येथील मराठा बांधवांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला.
शिवसेनेचे दिलीप पाटील,सागर बाराते, बाबुराव जोगदंड,संजय लोळे,मनोहर धोंगडे यांनी भेट दिली.व पाठींबा दर्शविला आहे.
उपोषणकर्ते किरण भातलवंडे यांना फोन द्वारे प्रसिद्ध व्याख्याते प्रदिप सोळुंके, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, सतिश काळे यांनी संवाद साधून पाठिंबा दिला आहे.
किरण भातलवंडे यांनी आमरण उपोषणाला बसुन कळंब तालुक्यातीत पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे, त्यामुळे जरागे पाटलांच्या मागे मराठा तरुण आता खंबीरपणे उभा टाकून स्वतः आंदोलनात सामील होऊ लागल्याने या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे कारण मराठवाड्यातील तरुणाच्या आता लक्षात आली आहे की आमच्या हक्काचं आरक्षण असतानाही आम्हाला 54 वर्षे कशासाठी द्यावाण्यात आला आहे असा संत्रप्त सवाल प्रशासनाकडे विचारू लागली आहेत. 1923 ते 1960 या निजाम काळात मराठा ची कुणबी म्हणून नोंद असल्याची पुरावे मिळाले आहेत परंतु 1960 नंतर कशासाठी डावण्यात आले आहे असा प्रश्न पडून नागरिक राज्यकर्तेच्या विरोधात रोष व्यक्त करू लागले आहेत

Post a Comment

0 Comments