Subscribe Us

लातुर लोकसभा निरिक्षकपदी शंकरराव बोरकर यांची निवड


 धाराशिव/तेरणेचा छावा:-
शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी 'होऊ द्या चर्चा' ही संकल्पना संपूर्ण राज्यात व्यापक स्वरुपात राबविण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात सखोल मार्गदर्शनही केले.व याठिकाणी शंकरराव बोरकर यांची लातुर लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदी निवड करण्यात आली.तसेच आपण स्वतः लातूर लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त गावे व प्रभागांमध्ये 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमांचे नियोजन व निरिक्षण करावे. अधिकाधिक ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहून आव्हाल पक्षश्रेष्ठींना सादर करावा.
      या मतदारसंघातील संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख यांचे मोबाईल क्रमांक आपणास देण्यात येत आहेत... वेबिनारद्वारे त्वरित बैठक घेऊन सूचना द्याव्यात व गावनिहाय कार्यक्रमांचे अंतिम नियोजन करावे.. संदर्भ, मुद्दे व प्रचार साहित्याचा संच आपणास देण्यात येत आहे.त्यानुसार मतदार संघाचे निरिक्षण करावे. अशा प्रकारची सूचना देण्यात आली आहे
अशा प्रकारे लातूर मतदारसंघाची मोठी जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या आदेशावरून  देण्यात आलेली आहे त्यामुळे शंकर (तात्या )बोरकर यांना पुन्हा एकदा मराठवाड्यात सक्रिय होण्याची आदेश देण्यात आलेले आहेत

Post a Comment

0 Comments