Subscribe Us

चालक दिन आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी ,वाहकांचा सन्मान, शपथविधी सह विविध कार्यक्रमांनी संपन्न.


धाराशिव/तेरणेचा छावा;-
जागतिक चालक दिनानिमित्त राज्य महामार्ग पोलीस मदत केंद्र येडशी टोलनाका धाराशिव येथे रविवार
दि. 17 सप्टेंबर रोजी  वाहन चालकाची नेत्र तपासणी आरोग्य तपासणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान व शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला. 
      डॉ. रवींद्र सिंगल अप्पर पोलीस महासंचालक (वा.), महाराष्ट्र राज्य, मुंबई, डॉ.अनिता जमादार , पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग,,छत्रपती संभाजीनगर,  डीसले सर, पोलीस उपाधीक्षक म. सु. प., छत्रपती संभाजीनगर गिरी सर, पोलीस निरीक्षक म.सु.प., छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक दिनानिमित्त महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा चालक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.  यावेळी  सर्वांची नाश्ता व चहापाण्याची सोय करण्यात आली होती. 
         यावेळी महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार व वाहन चालक यांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी डॉ. विलास तोडकर, डॉ. सुरेश गंगावणे, डॉ.गरजे, डॉ.कांबळे सर्व नेमणूक प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी यांच्या कडून एकूण 72 वाहन चालक यांची तपासणी करण्यात आली. 
            राज्य परिवहन महामंडळ धाराशिव येथील चालक व NH 52 वरील चालक यांना चालक दिनानिमित्त शुभेच्छा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला.
             तसेच वाहन चालक व महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत शपथ देण्यात आली. यावेळी धाराशिव येडशी टोल नाका महामार्ग सपोनि निशिकांत शिंदे व सर्व कर्मचाऱ्यांची, व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments