Subscribe Us

धाराशिव मध्ये 21 सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम....


जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मयुर काकडे यांचे आवाहन

धाराशिव/ तेरणेचा छावा:-
जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कल्याण विभाग’* *दिव्यांगांच्या दारी* हा कार्यक्रम जिल्ह्यात उस्मानाबाद येथे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत* आयोजित केला असल्याची माहिती प्रहारचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी दिली. 
            दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ' हा जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली* जिल्ह्यात औरंगाबाद रोडवरील छायादिप लॉन्स मंगल कार्यालय* येथे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 35 ते 40 स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. *कार्यक्रमस्थळी भोजन,नाष्टा व पाण्याची तसेच स्टेजवर जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच *दिव्यांग बांधवांना मुख्य कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती येथे सकाळी 7 वाजेपासून वाहनांची व बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.* तसेच नगरपालिका क्षेत्रात खाजगी वाहने तसेच बसने दिव्यांग बांधवांना आणण्यात येणार आहे.
              बसमध्ये दिव्यांगासाठी स्वयंसेवकांची तसेच डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. जे दिव्यांग बांधव कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांच्यासाठी पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायतमध्ये मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
            कार्यक्रमात शासनाचे सर्व विभाग, सर्व शासकीय यंत्रणा, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेणार आहे. तसेच दिव्यांगांना आवश्यक सर्व प्रमाणपत्रे, दिव्यांगत्वाचे युडीआयडी कार्ड, प्रमाणपत्र, मतदान कार्ड वाटप, रेशनकार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजना लाभ प्रमाणपत्र, घरकुल, बीज भांडवल वाटप तसेच वैयक्तिक लाभाचे वितरण, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक त्या प्रमाणपत्रांचे वाटप तसेच शासकीय योजनातून, सामाजिक संस्था व सी.एस.आर. मार्फत उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणाऱ्या विविध उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. 
              मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्टॉलच्या माध्यमांतून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगांचे अर्ज भरून घेण्यात येतील. तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांसाठी नोंदणी तसेच विविध महामंडळे व शासकीय विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात येणार आहेत. दिव्यांगांच्या सोईसाठी याठिकाणी दुभाषिकाची तसेच स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
              जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,जिल्हासघटक बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष जमीर शेख, जिल्हाउपाध्यक्ष महेश माळी, जिल्हासचिव महादेव चोपदार,उपाध्यक्ष महादेव खंडळाकर,नागनाथ पाटील,अजीम शेख,गणेश शिंदे,हेमंत उंदरे,चित्रा शिंदे,शशिकांत मुळे, इसाक शेख,महंमद अत्तार, श्रीमंत गरड, अभिजित साळुंखे,बाबासाहेब भोईटे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments