Subscribe Us

"लोकसभेत मराठवाडा" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मान्यवरांच्या हस्ते संपन्न


धाराशिव तेरणेचा छावा:_ 
दखल प्रकाशन 'लोकसभेत मराठवाडा 'या पुस्तकाचे प्रकाशन मराठवाडा मुक्ती संग्रामदिन रविवार दि.17 सप्टेंबर रोजी
खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नदूभैया राजेनिंबाळकर,संपतराव डोके, कळंबचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा म.बँकेचे माजी व्हा. चेरमन कैलास शिंदे ,सिंधुजन अकादमीचे डॉ.सुजित शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.याच कार्यक्रमात दखल प्रकाशन व शिंदे परिवार याच्या वतीने सेवानिवृत्त झालेले स्नेही सर्वश्री सुभाष पवार,राजीव नाईकनवरे,बाळासाहेब गोरे,प्रभाकर चोराखळीकर,सुनील भातलवंडे आदींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास चंद्रकांत शिंदे,मुकुंदराव चौधरी,ओहळ,सुनील काळे,युवा सेनेचे अक्षय ढोबळे,तेली महासंघाचे रवी कोरे,विर,संतोष खोचरे,मुन्ना शेख,सतीश शिंदे,बालाजी सावंत,सज्जन मते आदी मान्यवर उपस्थित होते.
          "लोकसभेत मराठवाडा" हे पुस्तक मराठवाड्यातील सर्व प्रमुख बुक स्टॉल वर विक्रीस उपलब्ध असून व्हि .पी.पोस्ट पार्सल ने ही ते आपण मागवू शकता. अशी माहिती पुस्तकाचे लेखक गणेश अण्णा शिंदे यांनी दिली

Post a Comment

0 Comments