Subscribe Us

प्रा.संतोष तौर यांना वृंदावन कृषीभूषण पुरस्कार जाहीर


येरमाळा/तेरणेचा छावा:-
 येथील जनहित परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संतोष तौर यांना पुणे येथील वृंदावन फाउंडेशन राजमुद्रा संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने  देण्यात येणारा वृंदावन कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
      महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी ,जलसंधारण ,गोपालन, पर्यावरण ,पशुपालन या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार   देऊन भूमिपुत्र गौरव सोहळ्यात सन्मानित करण्यात येते. 
 यावर्षी हा पुरस्कार रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00  वा. भावीसा सभागृह  मयसो सदाशिव पेठ पुणे  येथे आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी  ह भ प  संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज व ज्येष्ठ पर्यावरणवादी ह भ प  शिवाजीराव मोरे महाराज देहुकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे  व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय रवींद्र  शिंगणापूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे  तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन पाटील व  प्रा.डॉ.माणिकराव सोनवणे यांनी केले आहे
  प्रा. संतोष यांना पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होतात  मित्रपरिवार, हितचिंतकातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments