Subscribe Us

प्रा.रणजीत वरपे यांची राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड


धाराशिव/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मस्सा(खं) येथील प्रा.रणजित  वरपे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदवीधर संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
   यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस च्या वक्ता विभागाचे कळंब तालुकाध्यक्ष म्हणून 2017 पासून आजतागायत कार्यरत होते.वरपे हे राष्ट्रवादी मधील युवा वक्ते व एक उचशिक्षित चेहरा असून त्यांचे Bsc,M.A,SET,NET शिक्षण झालेले असून सध्या त्यांची भाषा विज्ञानात Phd सुरू आहे.त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांनी  त्यांना निवडीचे पत्र दिले.
   या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय मामा निंबाळकर,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,राष्ट्रवादीचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा.तुषार वाघमारे,राष्ट्रवादीचे कळंब तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर,उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे,उस्मानाबाद माजी नगरसेवक उदयसिंह निंबाळकर,राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके,बालाजी भातलवंडे,युवक जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सुरेश घोगरे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष भीमा हगारे,युवक तालुका तालुका उपाध्यक्ष विठ्ठल कोकाटे,युवा नेते अमर मडके,श्रीकांत मिटकरी आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments