धाराशिव /तेरणेचा छावा:-
सध्या शेतामध्ये खरीप हंगामातील कोवळी पिके असून या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान सुरु आहे. हे वन्य प्राणी रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये संघटितपणे शेतीचे नुकसान करत आहे. एकटा शेतकरी असल्यास तो हतबल होऊन डोळ्यादेखत नुकसान पाहत आहे, त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करुन नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरुवारी (दि.२७) निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील हजारो हेक्टरवर वाढलेल्या जंगलातून नागरी वस्त्या व शेतीमध्ये हरणाचे कळप, माकडे, वानर, रानडुक्कर आदी प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतातील छोटी पिके, झाडे, ऊस, सोयाबीन, पालेभाज्या, फळझाडे आदी पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत वन्य प्राणी रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये संघटितपणे शेतीचे नुकसान करत असताना एकटा शेतकरी हतबल होऊन पिकाचे नुकसान उघड्या डोळ्यांनी बघत आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचा आळा बसत नसल्यामुळे हतबल शेतकरी निराश झालेला आहे. एकीकडे गोगलगाय, पैसा आधी कीटकांच्या प्रादुभार्वामुळे हैराण झालेला शेतकरी रात्री वन्यजीव वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे रात्र रात्र जागून काढत आहे. त्यासाठी सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन हातबल शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, तसेच वन्य प्राण्यांपासून झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत, अशी मागणी निवेदनात संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.
0 Comments