Subscribe Us

रेल्वे मार्गात जाणाऱ्या जमीनीची थेट खरेदी करावी – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर


धाराशिव/तेरणेचा छावा:-
आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे माझ्यासह आमदार कैलास दादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा तसेच रेल्वेसाठीचे भुसंपादनाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली
     या बैठकी मध्ये रेल्वेसाठी शेतकऱ्यांची संपादीत होणाऱ्या जमीनीचे थेट खरेदी प्रस्ताव द्यायचे का नाही हे प्रत्येक गावाने   ठरवावेत तसेच   सदर प्रस्ताव रेल्वे विभागाने वरिष्ठ विभागास सादर करावेत. प्रत्यक्षात रेल्वे मार्गसाठी भू-संपादीत क्षेत्रात फळझाडे, विहीर, बोअरवेल,पाईपलाईन  जात असेल तर त्याचा मोबदला देण्यात यावा व संयुक्त मोजणीचा अहवाल भू-संपादीत गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथील सूचना फलकांवर प्रसिध्द करण्यात यावा. जर एखादी गोष्ट नजर चुकीने राहीली असेल तर 7 दिवसाच्या सूचना व हरकती उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडे लेखी दाखल कराव्यात व उपविभागीय कार्यालयाने त्या दुरुस्त करने साठी संयुक्त प्रत्यक्ष पाहणी करण्यात व पडताळणी करावी. अशा महत्वपूर्ण सूचना  जिल्हाधिकारी, भू-संपादन अधिकारी व रेल्वे  विभागाच्या अधिकाऱ्यास केल्या.
तसेच ग्रामीण मार्ग व शिव रस्ते जे शेतकरी बांधवाना आवश्यक आहेत त्या ठिकाणी अंडर पास करावेत
        या बैठकीस या  रेल्वे मार्गांचे कार्यकारी अभियंता, (सिव्हील) बनसोडे, श्री नारायणन,उपविभागीय अधिकारी खरमाटे अधिक्षक, भुमी अभिलेख व संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments