Subscribe Us

कळंब तालुक्यातील शेत रस्त्याच्या कामामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा.!

कळंब/तेरणेचा छावा:-
केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या कायद्या अंतर्गत गोरगरीब मजूर वर्गाला नियमित काम उपलब्ध व्हावे व त्यांचे जीवनमान उंचावे म्हणून रोजगार हमी योजना कायदा करण्यात आला या उलट उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये रो ह यो तून  ग्रामपंचायत अंतर्गत 50 ते 55 शेत रस्त्याची कामे चालू आहेत सदर कामे मजूर लावून करावयाची आहेत या कामावर मजूर न लावता मजुरांचे बोगस हजेरी मस्टर तयार करून शासनाला फसवून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करण्यात येत आहे म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी निवेदनात देऊन घोटाळेबाज अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे 
निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक कामावर तेच मजूर आहेत फक्त वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले आहेत एका कामावर चार ते पाच मजूर प्रत्यक्ष 30 ते 35 मजूर असल्याचे दाखवून हजेरी मस्टर बनवण्यात आले आहे या कामावर महिला मजूर नसताना महिला मजूर असल्याचे दाखवून बोगस मस्तर बनवून त्याचेही पैसे उचलण्यात आले आहेत  रो ह यो चे इंजिनिअर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक,ग्राम रोजगार सेवक, व सरपंच यांच्या संगणमताने बोगस कामे करून कामे न करता निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाला फसवून कोट्यावधी रुपये उचलून स्वतःचे खिसे गरम केले आहेत या कामाची पाहणी करण्यासाठी रो ह यो चे इंजिनीयर,ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक,व सरपंच, यांनी प्रत्यक्षात कधी कामावर न जाता काम केले आहे किंवा नाही याची पाहणी केली नाही स्पॉट पंचनामा स्थळ पाहणी न करता दौरे केल्याचे दाखवून त्याचेही पैसे उचलले आहेत शासनाला फसवून मजुराला उपाशी ठेवून स्वतःची पोळी भाजणाऱ्या व कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला.

Post a Comment

0 Comments