डॉक्टर विना कर्मचाऱ्यांच्या सहकार्यावर चालू आहे उपचार.
पशुपालकांची होतेय हेळसांड, डॉक्टर देण्याची होत आहे मागणी
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. डॉक्टर नसल्यामुळे अनेक योजना प्रलंबित आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयाने लक्ष देण्याची गरज
दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या असुन अडचण नसून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ येथील पशुपालकावर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकचा आहे.कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती येते आहे.परंतु डॉक्टर वेळेवर हजर नसतात.येथे कार्यरत असलेले डॉ शेळके यांची बदली झाली असून डॉक्टरची जागा रिक्त आहे.अद्याप पर्यंत पर्याय म्हणून कुणाची नेमणूक झाली नाही.येरमाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे काम बघतात.गरजेनुसार काही अडचणीची बाब असेल तर ते येऊन उपचार करतात.
परिसरातील आठ ते दहा गावातील पशुपालकांना या दवाखान्यावर अवलंबून रहावे लागते.गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर हजर नसल्यामुळे खाजगी उपचार करावे लागत आहे.सध्या दोन कर्मचारी सेवा देण्याचे काम करतात.दोन शिपाईची जागा आहे परंतु एक जागा रिक्त आहे.एक ड्रेसर एक शिपाई यांच्यावर येथील सेवा दिली जात आहे. या दवाखान्यातील सोयी सुविधा कडे व अपुऱ्या कर्मचारी वर्गाकडे ग्रामपंचायत कार्यालय लक्ष कशासाठी देत नाही असा प्रश्न नागरिकांतून एकावयात येत आहे
दवाखान्यात अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध आहेत.
बेरड वळुंचे खच्चीकरण, घटसर्प,गाई म्हशी ची गर्भ तपासणी, लसीकरण,पी पी आर, जंतनाशक, बाह्य परोपजीवी निर्मुलन, वारंवार उलटणाऱ्या आणि माजावर येणाऱ्या गाई म्हशीचे रोगनिदान व उपचार करणे.पशु संवर्धन विभागाकडुन विविध योजना राबविण्यात येतात त्याची जाहिरात करणे.प्रशिक्षण घेणे असे विविध सुविधा उपक्रम पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत घेतले जातात.
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. डॉक्टर नसल्यामुळे अनेक योजना प्रलंबित आहेत
पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सध्या सेवा विस्कळित झाली आहे.
सध्या पावसाळा सुरू होत आहे.रोगप्रतिबंधक उपाय योजना राबविण्यासाठी नियोजन केले जाते.डाॅक्टर नसल्यामुळे कारभार बेभरवशाचा आहे.पशुपालकातून लवकर डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.
श्रेणी-1चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे.परंतू डॉक्टर वेळ देत नाहीत.जे डॉक्टर होते त्यांची बदली झाली आहे.पावसाळा तोंडावर आला आहे.लसीकरण करण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे.जणावरांना उपचार करण्यासाठी दवाखाना आहे.सुविधा आहेत परंतु डॉक्टर नाहीत.लवकर डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी फुलचंद पाटील पशुपालक यांनी केली.
0 Comments