Subscribe Us

स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे !


दहिफळ /तेरणेचा छावा:-
दहिफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे  रस्त्याला मधोमध भेगा पडलेले असल्याचे दिसून येत असून  काम होऊन दीड ते दोन महिना  झाले नाही तोपर्यंत कामाची विल्हेवाट लागत असल्यामुळे काम कोणत्या दर्जाचे झालेले आहे हे यातून दिसून येत आहे. 
    आधीच स्मशानभूमी मरणसुन्न अवस्थेत असून मशाल भूमीत लोखंडी सापळा जाळी  कशाचाच पत्ता नाही असे असताना तिकडे जाणारा रस्ताही अशाच प्रकारे झालेला असल्यामुळे नेमका हा रस्ता लोकांच्या सोयीसाठी केला की आपली गुत्तेदारी चालावी यासाठी केला असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. 
ग्रामपंचायत ने या कामाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असतानाही याकडे का लक्ष दिले गेले नाही असा प्रश्नही सुज्ञ नागरीकातून विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments