Subscribe Us

मराठवाडा जनविकास संघातर्फे हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याची शौर्यगाथा कार्यक्रम संपन्न.


धाराशिव/तेरणेचा छावा:-
मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त मराठवाडा जनविकास संघ,मु.पो.धारुर व पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीन '' शौर्यगाथा '' हैदराबाद मुक्तीसंग्राम लढयाची सुंदर देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा संपर्क कार्यालय ,पिंपळे गुरव या ठिकाणी रविवार दि. २८ मे २०२३ रोजी करण्यात आले होते.
  गौरवशाली मराठवाड्याच्या मातीसाठी.. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ,हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी. मराठवाड्याचा हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ज्वाजल्य इतिहास नवीन पिढीस कळण्यासाठी . मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाठी. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अभ्यासु व्यक्तीमत्वांच्या विचार मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद् घाटन श्री संत गजानन महाराज मंदीर संस्थान सांगवी चे अध्यक्ष ह. भ. प. श्री. बब्रुवान वाघ महाराज यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास २५१ पुस्तक अर्पण करून दिप प्रज्वलन करुन अनोख्या पध्दतीन उद् घाटन करण्यात आले या वेळी जागतीक स्तरावर आंतरराष्ट्रीय कार्य करणारे उद्योजक श्री. विवेक भोसले, ह. भ. प. श्री. बाबुराव तांदळे महाराज ,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमीत्रअरुण पवार ,जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, सद् गुरु सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिन म्हसे, दिलीपराव बारडकर ,महिला उद्योजीका प्रितीताई काळे ,समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे ,मराठवाडा जनविकास संघ प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ शेटे ,राजपुत समाज संघटना अध्यक्ष शिवकुमार सिंह बायस, रवि पाटील , सतीश काळे, किशोर पाटील , सुर्यकांत कुरुलकर ,सोशल मिडीया प्रमुख प्रा. डॉ. प्रविण घटे ,अमोल लोंढे टीडीएम मराठी चित्रपटाचे अभिनेता पृथ्वीराज थोरात ,अभिनेत्री कालिंदी नेस्ताने ,कलावंत इंद्रभान करे आदी मंडळी उपस्थितीत होती.
  मराठवाडा जनविकास संघाच्या वतीन हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त ७५ अॅटो रिक्षा मराठवाडा मुक्तीसंग्राम  फिरते वाचनालय संकल्पना यशस्वी राबविण्यात येणार आहे त्यासाठी पहिला अॅटो रिक्षा मराठवाडा भुमिपुत्र श्री. जनार्धन सोनवणे यांचा ७५ पुस्तकांचे भेट देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते अॅटो रिक्षाचे उद् घाटन करून शुभारंभ करण्यात आला या मागची संकल्पना आहे कि पिंपरी चिंचवड ,पुणे,नवी मुंबई व मुंबई येथे राहणाऱ्या मराठी माणसांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ज्वाजल्य इतिहास कळावा. आपल्या धकाधकीच्या जीवनात अॅटो मधुन प्रवास करतानी पुस्तक वाचता यावे ही आपली प्रमाणीक भुमिका ठेऊन आपण फिरते वाचनालयाचा नवोदीत संकल्पना राबवत आहोत.
  क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे चिरंजीव इंजिनियर आंतरराष्ट्रीय कंपनीत अध्यक्ष पदावर कार्यरत राहीले श्री. विवेक भोसले यांनी अपरिचित हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास त्यांचे कार्य यावर खुप चांगली माहीती त्यांनी दिली त्या मध्ये त्यांनी रॉबीनहुड क्रांतीवीर दत्तोबा भोसले ,कन्नाडाचा वाघ देशमुख ,क्रांतीवीर माणिकचंद पहाडे ,जामगावचे विठ्ठलराव पाटील ,क्रांतिसिंह नाना पाटील ,बाराबुलेतदार स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहीती दिली त्याच बरोबर त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात सशस्त्र लढा आणि सशस्त्र ५१ कॅम्पचे महत्व सांगितले आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने नव्यान अभ्यासपुर्ण इतिहासाचे लिखाण हैदराबाद मुक्तीसंग्रामावर व्हावे ही भुमिका स्पष्ट पणे आपल्या विचारातुन व्यक्त केली.
दक्षिण आशियाई प्रादेशिक देश ब्रिलीयन्स पुरस्कार प्राप्त पुस्तक दान चळवळ नेटाने चालविणारे श्री. सचिन म्हसे यांनी आपल्या विचार मंथनातुन सांगीतले, येत्या वर्षभरात संपुर्ण मराठवाडयात ७५० मराठवाडा मुक्तीसंग्राम वाचनालय चालु करण्याचा मनोमन संकल्प व्यक्त केला आणि आई तुळजाभवानीच्या तुळजापुर तालुक्यात ७५ वाचनालय चालु करण्याचे पहिले पाऊल म्हणुन बारुळ येथील शिवानंद सार्वजनिक वाचनालयास २५१ पुस्तकांची भेट कार्यक्रमात देण्यात आली. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अरुण पवार यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री श्री. देवेंन्द्र फडणवीस व विरोधी पक्षनेता श्री. अजितदादा पवार यांच्या कडे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या ११ मागण्या केले आहेत त्यांचा पाठपुरावा करुन मंजुर करुन घेऊ त्याच बरोबर मराठवाडयातील अपरिचित स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास पुस्तक रुपात आणण्यासाठी सढळ हाताने सर्वतोपरी मदत करण्यात येईल आणि मराठवाड्यात येत्या एका वर्षात ७५ हजार वृक्ष लागवड व संवर्धन आणि ७५ हजार पुस्तकांचे वाटप हे अभियान यशस्वी पणे राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ सिंदगी ते समाधीस्थळ हैदराबाद पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा संकल्पक श्री. नितीन चिलवंत यांनी सुंदर पध्दतीन सुत्रसंचलन केले. ह. भ.प. श्री. बाबुराव तांदळे महाराज, जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब काकडे,शिवकुमारसिंह बायस,यानीही मनोगत व्यक्त केले.
टीडीएम चित्रपटचे अभिनेता श्री. पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालींदा नेस्ताने यांनी वर्षाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम शौर्यगाथा चित्रपट निर्माण करु अस सांगितले एकंदरीत सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मना पासुन प्रयत्न केले. आभार प्रदर्शन सुर्यकांत कुरुलकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments