Subscribe Us

खुन, जबरी चोरी, अपहरण अशा गंभीर गुन्हयातील फरार सराईत गुन्हेगार अमोल मुंढे अखेर पोलीसांकडुन जेरबंद


धाराशिव/तेरणेचा छावा:-
दिनांक १८/११/२०२१ रोजी रात्री इसम नामे कृष्णा शिवशंकर कोरे, वय २३ वर्षे, रा. गणेशनगर, उस्मानाबाद यास ढोकी येथून उस्मानाबाद येण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे वाहनामध्ये बसवुन ढोकी से उस्मानाबाद येत असताना मागे शिगोली गावाचे शिवारात गड देवधर पाटी जवळ कोणत्यातरी कारणावरुन त्याचा घातपात करून पुरावा नष्ट करण्यासाठी कृष्णा याचे कपडे काढुन त्याचे प्रेत मोकळ्या पटांगणात गवतात फेकुन दिले होते. सदर इसम हरवल्याबाबत पोलीस ठाणे ढोकी येथे नोंद करण्यात आली होती. गड देवधर पाटी जवळ प्रेत मिळाल्यावरुन पोलीस ठाणे आनंदनगर जि. उस्मानाबाद येथे आकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. सदर मयत व पोलीस ठाणे ढोकी येथे हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीमधील तक्रारकर्ते यांचा डी एन ए जुळुन आल्याने पोलीस ठाणे आनंदनगर येथे अज्ञात इसमांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
     सदर गुन्हयाचे तपासामध्ये तीन आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी दोन आरोपी १) रमेश भगवान मुंढे, रा. कोपाळ, ता. धारूर जि. बीड, व २) शिवशंकर हरिभाऊ इंगळे, रा. केज, ता. केज, जि. बीड यांना यापूर्वीच गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा मास्टर माईंड मुख्य आरोपी नामे अमोल अशोक मुंढे हा घटना घडल्यापासून फरार होता. त्याच्यावर बीड, उस्मानाबाद, परभणी, पुणे अशा महाराष्ट्रातील विविध जिल्हयांत खुन, जबरी चोरी, विषारी पदार्थाच्या सहाय्याने दुखापत करणे, खंडणी व जबरी चोरी करता अपहरण करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पोलीसांना तो पाहिजे असल्याने विविध ठिकाणचे पोलीस दले त्याचे मागावर होते. तो प्रचंड धाडसी व बेडर आहे, त्याचे गाव कोयाळ हे अत्यंत दुर्गम, डोंगराळ भागात असुन त्याची शेती गावापासून दूर आहे तो परिसर दरी खोऱ्यांचा दगड गोट्यांचा असुन तेथील परिसराची अमोल मुंडे याला चांगली माहिती असल्याने तो नेहमी जागा बदलून राहत असे पोलीसांची चाहुल लागताच तेथील भौगोलिक परिस्थितीचा गैरफायदा घेवुन तो त्याचे अस्तित्व लपवून पोलीसांना वारंवार गुंगारा देत होता. कोयाळ गावात व आजुबाजुच्या गावांमध्ये त्याचे धाडसी व गंभीर गुन्हे करण्याच्या पार्श्वभूमीमुळे प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्याचे ठावठिकाण्याबाबत माहिती देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते याच गोष्टीचा फायदा घेवून अमोल मुंढे हा मागील दिड वर्षांपासून फरार होता.
   पोलीस ठाणे आनंदनगरचे अधिकारी व कर्मचारी हे गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे मागावर होते. मौजे कोयाळ येथे वारंवार पोलीस पथक जावुन गोपनिय माहिती व इतर माध्यमातून त्याचा शोध घेत होते. दिनांक २७/०५/२०२३ रोजी मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद व श्री नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस टाणे आनंदनगरचे पोलीस पथक अमोल मुंडे याचे शोधकामी बीड जिल्ह्यातील कोपाळ, धारूर, परळी भागात गेलेले असताना त्यांना आरोपी अमोल अशोक मुंढे हा मौजे गोवर्धन ता. परळी या गावाचे शिवारात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांनी शिवारात अमोल मुंडे याचा शोध घेवून कॅनल लगतच्या एका शेतामध्ये त्याची मो. सा. दिसल्याने तो आसपास असण्याची शक्यता वाटल्याने तो पिंजुन काढुन सापळा रचुन त्याला शिताफीने ताब्यात घेतले व उस्मानाबाद येथे आणून पोलीस ठाणे आनंदनगर गु.र.नं. ८५/२०२२ कलम ३०२, २०१, ३४ भादंवि या गुन्हयात अटक केले आहे.
सदरची कारवाई श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, श्री नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, श्री एम रमेश, सहा. पोलीस अधीक्षक, कळंब, श्री दिलीप पारेकर पोलीस निरीक्षक आनंदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड, पोहवा सुनिल हांगे ब.नं. १२२९ पोहवा गुलचंद गंगावणे ब.नं. ६२८ पोना कैलास सोनवणे ब.नं. २४९ यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्री दिलीप पारेकर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आनंदनगर हे करत असून आरोपी अमोल मुंडे यास दिनांक २८/०५/२०२३ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments