दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळम तालुक्यातील शेलगाव( दि.) येथील ग्रामस्थांनी सरपंच अर्चना गाढवे व ग्रामसेवक नागटिळक यांना वारंवार भरलेल्या कचरा कुंड्या उचलून नेण्याविषयी सांगण्यात आले होते परंतु त्या उचलल्या नाहीत यामुळे ग्रामस्थांना दुर्गंधी व त्याचा त्रास होत होता याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी भरलेल्या कचराकुंडीतील कचरा कुंडीसह ग्रामपंचायत कार्यालयमध्ये व ग्रामपंचायत समोर आणून टाकला.
यामध्ये युवा नेते वेंकटेशन दिवाने शहाजी अण्णा दिवाने .शहाजी भातलावन्डे.,जेष्ठ नागरिक बापू गोरे खंडू भातलावन्डे शिवाजी दिवाने प्रकाश दिवाने गणेश दिवाने शहाजी दिवाने विजय दिवाने तानाजी दिवाने विकास दिवाने बिपीन पाटील नितीन पाटीलविलास दिवाने , मेश्राम चंदनशिवे ,शहाजी पांडुरंग दिवाने धम्मरत्न चंदनशिवे ,बाबासाहेब दिवाने
सह ग्रामस्थ सहभागी झाले होते,
यावेळी ग्रामस्थांनी इशारा दिला की 48 तासात जर गावातील नाल्या साफसफाई केली नाही तर कचऱ्याप्रमाणेच नाल्यातील गाळही आणून ग्रामपंचायत कार्यालयात टाकण्यात येईल, त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामपंचायत कार्यालय काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
0 Comments