संग्रहित चित्र
येरमाळा/तेरणेचा छावा:-
येडेश्वरी यात्रेतील अवैद्य धंदे बंद करण्याच्या मागणीची बातमी तेरणेचा छावा या वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आली होती या बातमीची दखल घेत
मा.पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये येरमाळा यात्रा येथे अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी शनिवार दि. 08. एप्रिल रोजी येरमाळा यात्रा येथे पथक तयार करुन त्यांना गोपनीय माहिती काढुन येरमाळा यात्रा येथे सुरट व टायगर नावाचा जुगार खेळणारे विरुध्द कारवाई करणेसाठी सांगण्यात आले होते. सदरचे पथक यांनी गोपनिय माहीती मिळाली की, येरमाळा यात्रा येथे एकुण 21 जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचेकडुन एकुण 16310/- रु रोख रक्कम व 06 मोबाईल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. परंतु येरमाळा येथे सहा व सात या दिवशी दारू विक्री बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही अनेक ठिकाणी दारूविक्री दारूबंदी खात्याला कशी दिसली नाही अवैद्य आणि बनवत दारू कोण विक्री करत हे त्या खात्याला माहीत नसेल तर नवलच परंतु कारवाई झालेली कुठेही दिसली नसल्याने जनमानसातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत?
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सपोनि कासार, सायबर सेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकाने केली आहे.
येडेश्वरी मंदिर व येरमाळा परिसरात चालणारे ही अवैध धंदे बनावट दारू बनविणारे ,विकणारे रॅकेट यांचा छडा लावून त्वरित बंद करण्याची मागणी भाविक भक्तातून होत आहे याकडे नेमकं दारूबंदी खाते व पोलीस प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
0 Comments