Subscribe Us

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची करणार पाहणेनुकसानग्रस्त पाहणीचा दौरा असल्याने अनेक इच्छुकांचे पक्षप्रवेश रखडणार?


      
   धाराशिव /तेरणेचा छावा:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  धाराशिव  जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
        मंगळवार दि.11 एप्रिल  रोजी दुपारी 1.30 वा.तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने उस्मानाबाद तालुक्यातील धारूर कडे प्रयाण. दुपारी 1.50 वा.धारुर येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.दुपारी 2.20 वा.मोटारीने उस्मानाबाद तालुक्यातील  वाडीबामणी कडे प्रयाण.दुपारी 2.40 वा. वाडीबामणी येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.दुपारी 3.10 वा.मोटारीने तुळजापूर हेलिपॅड कडे प्रयाण.दुपारी 3.20 वा.तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व  हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा जिल्ह्यातील पहिला दौरा असल्यामुळे प्रशासनाने जयत तयारी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या अशा  पल्लवीत झालेल्या असून मुख्यमंत्री काय पॅकेज घोषित करतात याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी मुख्यमंत्री जिल्ह्यात येण्याची वाट पाहत होते परंतु मुख्यमंत्र्यांचा हा नुकसानग्रस्त पाहणी दौरा असल्याने अनेक इच्छुकांचे पक्षप्रवेश होतात की लांबणीवर पडतात याकडेही राजकीय जाणकाराचे लक्ष आहे. गेल्याच आठवड्यात कळम नगरपरिषदेतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्षासह अनेक सदस्यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी शिवसेना प्रवेशासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे सांगण्यात येत असून त्यांचा नेमका प्रवेश कधी होतो हे  पाणी गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत, उच्चतंत्र शिक्षण मंत्री तसेच शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर सह मंत्रिमंडळातील अनेक सहकारी यावेळेस दौऱ्यावर येणार अस  सांगण्यात येत आहे..

Post a Comment

0 Comments