Subscribe Us

व्हॉईस ऑफ मीडियाच्या महानगराध्यक्षपदी सोनवणे यांची निवडउ

धाराशिव/तेरणेचा छावा:-पत्रकारांच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना करीत आहे. या संघटनेच्या महानगराध्यक्षपदी मल्लिकार्जुन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड एका नियुक्ती पत्राद्वारे व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आली. दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, आपण खूप गतीने काम कराल. पत्रकारांच्या व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारीत पत्रकारिता ही विचारधारा कायम रहावी ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो ती पत्रकारिता शाबूत व सुरक्षित रहावी यासाठीच आपण कार्य करावे. तसेच आपणास दिलेली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, काकासाहेब कांबळे, कुंदन शिंदे राहुल कोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments