Subscribe Us

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली श्री येडेश्वरी यात्रा परिसराची पाहणी

येरमाळा /तेरणेचा छावा:- येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा आढावा बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना नसल्याने यात्रा रामभरोसे मथळ्याखाली  तेरणेचा छावा मध्ये (ता.२९) रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत.पोलिस अधीक्षक अधिकारी,उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी शनिवार (दि. 1 एप्रिल) रोजी भेट देऊन मंदिर,यात्रा,परिसराची पाहणी केली.
  श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा मानली जाते.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी दर वर्षी जिल्हा प्रशासन तयारी करते.यासाठी यात्रेच्या महिनाभरा पूर्वी नियोजन पंधरा दिवस आधी आढावा बैठका होतात.मात्र या बैठकीला विभागीय अधिकारी हजर आसतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीच्या सूचना नसतात त्यामुळे यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासन स्थानिक प्रशासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुळजापूर देवस्थानच्या तुलनेत वरिष्ठांचे येडेश्वरी देवस्थानकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत होता.बारमाही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा भाविक येडेश्वरी दर्शनाला येतोच त्याशिवाय तुळजाभवानीची वारी अपूर्ण मानली जाते.त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येडेश्वरी देवस्थान कडे लक्ष द्यावे ते यात्रा बैठकीला हजर नसतात त्यामुळे यंदाची यात्रा रामभरोसे या मथळ्याखाली (ता.२९) रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत शनिवार (ता.१) रोजी ३ वा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कावत, उपविभागीय पोलिस अधिकारी एम.रमेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी भेट देऊन येडेश्वरी मंदिर,पालखी मार्ग,चुन्याच्या रानात (शेतात),आमराई पालखी मंदिर,आमराई यात्रा परिसराची पाहणी केली.यावेळी जिल्हा विशेष शाखा पोलिस निरीक्षक एस. डी.दासुरकर,सपोनि अतुल पाटील,पिएसआय एन. आर.नाईकवाडी,आनंदराव वाठोरे  उपसरपंच गणेश बारकुल,माजी सरपंच विकास बारकुल,प्रीतेश बारकुल देवस्थानचे पुजारी समाधान बेदरे,संतोष आगलावे यांच्यासह ग्रामपंचायत,सदस्य,पुजारी उपस्थित होते.
आमराई परिसरात भरणाऱ्या यात्रेतील दाखल होणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांच्या लाईन मधील अंतर सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.पोलिस प्रशासनाने भेट दिली असली तरी जिल्हाधिकारी कधी भेट देतील या कडे येरमाळकरांचे लक्ष लगले आहे. .

Post a Comment

0 Comments